सुषमा स्वराज यांचा शब्द मुलीने पाळला, हरीश साळवेंना एक रुपया दिला

भारताच्या धडाकेबाज माजी दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांची मुलगी बासुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांनी हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव खटल्यासाठीचा 1 रुपया ही फी (Sushma Swaraj daughter Bansuri fulfils mother promise) दिली आहे.

सुषमा स्वराज यांचा शब्द मुलीने पाळला, हरीश साळवेंना एक रुपया दिला

नवी दिल्ली : पाक कोठडीतील कुलभूषण जाधव (Kulbushan Jadhav case) यांचा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टात चालवणारे भारताचे वकील हरीश साळवे (Harish Salve) यांना अखेर त्यांची फी मिळाली आहे. भारताच्या धडाकेबाज माजी दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांची मुलगी बासुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांनी हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव खटल्यासाठीचा 1 रुपया ही फी (Sushma Swaraj daughter Bansuri fulfils mother promise) दिली आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनापूर्वी साळवेंना फोन करत फी घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र त्यापूर्वी अचानक त्यांचे निधन (Sushma Swaraj daughter Bansuri fulfils mother promise)झाले.

सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांनी शुक्रवारी हरीश साळवे यांना त्यांची फी घेण्यासाठी बोलवलं. सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचे पती स्वराज कौशल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “बासुरीने तुझी शेवटची इच्छा पूर्ण केली. कुलभूषण जाधव यांचा खटला लढवणारे वकील हरीश साळवे यांचा एक रुपया फी तू मागे सोडली होतीस. बासुरी यांनी तो एक रुपया हरीश साळवे यांना भेट म्हणून दिला आहे.”

सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने हरीश साळवे हे कुलभूषण जाधव यांचं प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडत होते. महत्त्वाचं म्हणजे हरीश साळवे या खटल्यासाठी केवळ 1 रुपये फी घेणार होते. 18 जुलैला कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताच्या बाजूने निकाल दिला, त्यानंतर हरीश साळवे यांना 1 रुपयाच्या फीबाबत विचारलं होतं. तेव्हा त्यांनी या खटल्यासाठी मिळणारा एक रुपया अजून मिळाला नाही, दिल्लीत गेल्यावर घेईन, सुषमा स्वराज यांच्यासोबतही बोलणं झालंय, असं त्या दिवशी सांगितलं (Sushma Swaraj daughter Bansuri fulfils mother promise) होतं.

दुर्दैवी योगायोग म्हणजे सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वी हरीश साळवे यांचे त्यांच्याशी याच मुद्द्यावर बोलणं झालं होतं. कुलभूषण जाधव खटल्याची 1 रुपयांची फी उद्या घेऊन जा असं सुषमा म्हणाल्या होत्या.

मात्र त्यानंतर सुषमा यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण मंगळवारी 6 ऑगस्टला त्यांची प्राणज्योत मालावली.

पाकिस्तानच्या वकिलावर 20 कोटी रुपये खर्च

कुलभूषण प्रकरणात पाकिस्तानने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात 2 वकील बदलले. मात्र, भारताचे वकील साळवे या दोघांवरही वरचढ ठरले. विशेष म्हणजे हरीश साळवे यांनी हा खटला लढण्यासाठी आपली फी (शुल्क) म्हणून केवळ 1 रुपया घेतला आहे. दुसरीकडे कुलभूषण यांची शिक्षा कायम रहावी यासाठी पाकिस्तानने आटोकाट प्रयत्न केले. पाकिस्तानने आपल्या वकिलावरच तब्बल 20 कोटी रुपये खर्च केले.

तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी 15 मे 2017 रोजी एक ट्वीट करत साळवे यांनी कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी केवळ 1 रुपये मानधन घेतल्याचं सांगितलं होतं.

कोण आहेत हरीश साळवे?

साळवे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आहेत. ते देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. त्यांची एका दिवसाची फी जवळजवळ 30 लाख रुपये असल्याचेही सांगितले जाते. मात्र, कुलभूषण प्रकरणात त्यांनी केवळ 1 रुपया घेतला. ते 1999 से 2002 पर्यंत देशाचे सॉलिसिटर जनरल देखील होते. त्यांचे वडील एन. के. पी. साळवे काँग्रेसचे माजी खासदार आणि क्रिकेट प्रशासकीय मंडळावर होते. हरीश साळवे यांनी भारताच्यावतीने नेदरलँडमधील हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) बाजू मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडपणे उल्लंघन केल्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला.

संबंधित बातम्या :

रात्री 8.50 वा. फोन झाला, सुषमा स्वराज यांनी उद्या 1 रुपये फी घेण्यासाठी बोलावलं होतं, हरीश साळवेंना धक्का

कुलभूषण जाधव खटला: पाकिस्तानच्या 20 कोटींविरोधात भारताचा 1 रुपया जिंकला

देशातले सर्वात महागडे वकील हरिश साळवे कोण आहेत?

अजून 1 रुपया मिळाला नाही, दिल्लीत जाऊन घेणार : हरिश साळवे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI