पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय, फडणवीस-दरेकर साथीला; नारायण राणेंचं ट्विट

आज केंद्रिय मंत्री नारायण राणे कोकण दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय. फडणवीस-दरेकर साथीला असणार आहेत, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय, फडणवीस-दरेकर साथीला; नारायण राणेंचं ट्विट
नारायण राणे, देवेेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 9:49 AM

मुंबई :  कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत. रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल 40 लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) कोकण दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय. फडणवीस-दरेकर साथीला असणार आहेत, असं ट्विट त्यांनी केलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील चिपळूणचा दौरा करत आहेत. मात्र त्यांचा उल्लेख राणेंनी आपल्या ट्विटमध्ये केलेला नाही.

मोदींच्या संमतीने दौरा, माझ्या साथीला-फडणवीस दरेकर

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत, असं ट्विट नवनिर्वाचित केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी केलं.

उद्धव ठाकरे-राणे-फडणवीस-दरेकर एकाच वेळी चिपळूणमध्ये

रायगडच्या तळीये गावच्या विदारक परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री आज चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांचाही आज कोकण दौरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत.

राणे-फडणवीसांचा दौरा कसा असणार?

सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने मुंबईवरुन महाडकडे रवाना दुपारी 12 वाजता रायगडवरुन खेडकडे प्रयाण दुपारी 1 वाजता खेडवरुन चिपळूणकडे प्रयाण व पाहणी

चिपळूणमध्ये महापुरानं हाहा:कार

चिपळूणमध्ये महापुरानं हाहा:कार माजला आहे. संपूर्ण बाजारपेठ, एसटी स्टॅन्ड, शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. पाणी ओसरल्यानंतर आता नागरिकांकडून साफसफाई केली जात आहे. मात्र, ते करत असताना आपलं सर्वस्व गमावल्याचं चिपळूणकरांना पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री 11.30 वाजता चिपळूणमध्ये

अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री चिपळूणला पोहोचतील. तिथे चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाची पाहणी ते करतील चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत.

(Minister Narayan Rane Today Will Visit devastated Taliye village Chiplun And Khed Konkan)

हे ही वाचा :

Kokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.