Sunil Kedar Dance Video : नागपुरात मंत्री सुनील केदारांनी धरला ठेका, कार्यक्रमात स्टेजवरच युवकांसोबत नृत्य

एक युवक नृत्याच्या काही टिप्स केदार यांना सांगताना दिसतो. त्यानंतर पुन्हा केदार नृत्य करतात. या त्यांच्या व्हिडीओने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. त्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या फेसबूक पेजला शेअर केला.

Sunil Kedar Dance Video : नागपुरात मंत्री सुनील केदारांनी धरला ठेका, कार्यक्रमात स्टेजवरच युवकांसोबत नृत्य
नागपुरात नृत्य करताना मंत्री सुनील केदार
Image Credit source: facebook
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 26, 2022 | 3:04 PM

नागपूर : राज्याचे पशुसंवर्धन, क्रीडा (Sports Minister) व युवक कल्याण मंत्री सुनील केदार हे रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. पण, आज त्यांचा वेगळाच व्हिडीओ समोर आलाय. तो म्हणजे डॉन्स (Dance) करताना. टाईम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाईम्स समूहातर्फे हॅपी स्ट्रीट हा उपक्रम आज राबविण्यात आला. या कार्यक्रमाला मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. आरोग्याप्रती असलेला नागपूर शहरातील युवा (Youth) पिढीचा आत्मविश्वास व जोश हा कौतुकास्पद आहे, असं यावेळी सुनील केदार म्हणाले. यावेळी युवक एका गाण्यावर डान्स करत होते. त्यामुळं त्यांनी सुनील केदार यांनाही डान्स करण्यासाठी आग्रह केला. सुरुवातीला तसे ते तयार नव्हते. पण, युवकांनी आग्रह केला. त्यानंतर सुनील केदारांनी ठेका धरला. जवळपास एक मिनीट ते मनसोक्त नाचताना दिसले. त्याचा व्हिडीओही त्यांनी त्यांच्या फेसबूकवर पोस्ट केलाय.

पाहा व्हिडीओ

पंजाबी गाण्यावर नृत्य

युवकांसोबत असल्यानं सुनील केदार यांनाही जोश आला. तेही त्यांच्यासोबत नाचू लागले. दोन्ही हात वर केले. मग, युवकांनी टाळ्या वाजविल्या. प्रेक्षकांकडूनही टाळ्यांचा कडकडाट झाला. या टाळ्यांनी सुनील केदार यांना आणखी प्रोत्साहन दिले. मग, एक युवक स्टेजवर जसं नाचत होता तसं पाहून नाचण्याचा प्रयत्नही केदार यांनी केला. सुमारे 15 सेकंद चांगलेच नाचल्यावर सुनील केदार थोडा वेळ थांबले. युवकांनी स्टेजवर नाचणं सुरूच ठेवलं. त्यावेळी एका युवकानं केदार यांच्या कानात काहीतरी सांगितलं. लोकांचा आग्रह आहे म्हणून नाचा असं काहीतरी. मग, 7 सेकंद थांबल्यानंतर पुन्हा केदार नाचायला लागले. बाजूला एक युवती नाचत होती. तिच्या नृत्याला त्यांनी रिस्पान्स दिला. पुन्हा एक युवक नृत्याच्या काही टिप्स केदार यांना सांगताना दिसतो. त्यानंतर पुन्हा केदार नृत्य करतात. या त्यांच्या व्हिडीओने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. त्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या फेसबूक पेजला शेअर केला.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

सुनील केदार हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. कोणत्याही कार्यक्रमात गेले की, त्याचे फोटो आणि थोडक्यात माहिती त्यांच्या फेसबूक पेजला शेअर करतात. तसाच हा व्हिडीओही त्यांनी फेसबूक पेजला शेअर केला. आता त्यावर त्यांच्या चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत. एकीकडं राज्यात राजकीय नाट्य सुरू असताना दुसरीकडं सुनील केदार मात्र धम्माल उडविताना दिसले.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें