AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad : ‘हा आका कोण? आणि पंकजा मुंडे…’, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

Jitendra Awhad : "मोहन भागवत यांनी योग्य वक्तव्य केल आहे आणि याचं समर्थन मी करतो. कारण कधी पर्यंत ही धार्मिक हिंसा आपण पहावी. आपली प्रगती अशामुळे होणार नाही" असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांच्या वक्तव्याच समर्थन केलं.

Jitendra Awhad : 'हा आका कोण? आणि पंकजा मुंडे...', संतोष देशमुख हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड
| Updated on: Dec 20, 2024 | 11:34 AM
Share

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे सगळ्या राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विधानसभेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. हिवाळी अधिवेशनात या हत्येचे पडसाद उमटले आहेत. आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. “मला नाही वाटत, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात पंकजा मुंडे यांचा काही संबध असेल पण वाल्मिक कराड हा कोण आहे? त्याला का संरक्षण दिलं जात आहे, याचा तपास झाला पाहिजे” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“सुरेश धस सातत्याने आका बोलत आहेत. पण त्या ‘आका’च नाव का ते घेत नाहीत? घाबरत आहेत का ते, नाव घेण्यापासून. मग आपण लोकप्रतिनिधी आहोत ना, आपण न्याय कसा द्यायचा लोकांना?” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधी भाजपकडून जो इतिहास सांगितला जातोय, त्यावर त्यांनी त्यांचे विचार मांडले.

‘आत्ता चुकीचा इतिहास भाजप मांडत आहे’

“बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोटा इतिहास पसरवला जात आहे. त्यामुळे एक फेक नरेटिव्ह तयार होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने मुंबईतून निवडून दिलं आहे, याची माहिती इतिहासात आहे. जयकर कुटुंबीयांची खासदारकी पद काढून आंबेडकर यांना खासदार बनवल गेलं होतं. पण आत्ता चुकीचा इतिहास भाजप मांडत आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीवर काय म्हणाले?

“मिळून मिसळून राहू. आमच्या व्यवहारामुळे दुसऱ्याची अडचण होणार नाही हे पाहू. जितकी श्रद्धा माझं जे काही आहे, त्या विषयी माझी आहे, तितकीच श्रद्धा दुसऱ्याच जे आहे त्या विषयी असेल” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मोहन भागवत यांनी योग्य वक्तव्य केल आहे आणि याचं समर्थन मी करतो. कारण कधी पर्यंत ही धार्मिक हिंसा आपण पहावी. आपली प्रगती अशामुळे होणार नाही” “कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला मारहाण झाली, त्याला मुजोर प्रवृत्ती म्हणतात. मुख्यमंत्री कार्यालयाच्या धमक्या देण हे योग्य नाही” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...