औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत सत्तांतरानंतर आणि फाटाफुटीनंतर समीकरणे बदलली आहेत. रस्सीखेचमध्ये शिंदे गटाने (Shinde Group) जास्तीत जास्त आमदार ओढल्याने जिल्ह्याच्या राजकारणात दोन्ही गटात सामना रंगला आहे. मुंबईनंतर सर्वाधिक घडामोडी सध्या औरंगाबादच्या राजकीय पटलावर घडत आहे. आता आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच त्यांना ललकारले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.