AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election 2022: बविआची तीन मतं कुणाला? हितेंद्र ठाकूरांनी मतदानानंतर मोकळं करुन सगळं सांगितलं

'मला गेटवर आधी भाजपवाले भेटले, पुढे काँग्रेसवाले भेटले, त्यानंतर राष्ट्रवादीवाले भेटले, सगळ्याच पक्षाचे नेते भेटले. संबंध चांगले आहेत. आता निकाल लागल्यावर कळेल कोण फुटलं कोण नाही. ज्याचा उमेदवार पडेल त्याची मतं फुटली म्हणायची'.

MLC Election 2022: बविआची तीन मतं कुणाला? हितेंद्र ठाकूरांनी मतदानानंतर मोकळं करुन सगळं सांगितलं
हितेंद्र ठाकूर, नेते, बहुजन विकास आघाडीImage Credit source: TV9
| Updated on: Jun 20, 2022 | 6:05 PM
Share

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) मतदान पार पडलं. 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही रंगत पाहायला मिळाली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपकडूनही विजयाचा दावा केला जातोय. या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं होतं. राज्यसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बविआचे तीन आमदार आणि अन्य तीन अपक्षांची मतं फुटल्याचा दावा केला होता. त्या आमदारांची नावंही त्यांनी घेतली होती. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची मतं कुणाला मिळाली? अशी चर्चा सुरु आहे. त्याचवेळी बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिलीय.

‘ज्याचा उमेदवार पडेल त्याची मतं फुटली म्हणायची’

हितेंद्र ठाकूर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘मी सर्व पक्षांचा आभारी आहे की त्यांनी मला जवळचा समजतात. आमच्या भागात जो विकासकामं करतो त्याला आम्ही मतदान करतो. मला गेटवर आधी भाजपवाले भेटले, पुढे काँग्रेसवाले भेटले, त्यानंतर राष्ट्रवादीवाले भेटले, सगळ्याच पक्षाचे नेते भेटले. संबंध चांगले आहेत. आता निकाल लागल्यावर कळेल कोण फुटलं कोण नाही. ज्याचा उमेदवार पडेल त्याची मतं फुटली म्हणायची.

आमदार म्हणजे काय मच्छी मार्केट आहे काय?

संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीवेळी केलेल्या आरोपाबाबत विचारलं असता हितेंद्र ठाकूर म्हणाले की, मला सांगा आमदार म्हणजे काय मच्छी मार्केट आहे काय? सिद्ध करुन दाखवा, कुणी पैसे घेतले, कुणाचे पैसे घेतले, जाहीर करा ना एकदा लोकांसमोर. सगळ्यात महत्वाचं त्यांनी आमच्यावर आरोप केला नव्हता. यांची मतं मिळाली नाहीत. बाकी कुरण, हरभरे… त्यांनी माझ्यावर आरोप केला नव्हता.

बाकी गद्दार कोण, आपल्या आईचं दूध विकणारा वगैरे… बरोबर आहे. प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. आपल्या पार्टीशी इमानदार राहा, पार्टीशी इमान बाळगा, बरोबर बोलले ते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर अधिक बोलणं हितेंद्र ठाकूर यांनी टाळलं.

निकालापुर्वीच काँग्रेसला झटका!

विधान परिषद निवडणुकीत निकालापूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसलाय. कारण, काँग्रेसनं भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. टिळक आणि जगताप यांनी आपली मतपत्रिका स्वत: मतपेटीत न टाकता सहकाऱ्यांचा वापर केला. हा गोपनीय मतदानचा भंग असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, आता राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आपला निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.