AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन ‘फेल’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधात केलेलं सर्च ऑपरेशन फेल ठरल्याचे समोर आलं (MNS Bangladeshi Search Campaign Pune) आहे.

पुण्यात मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन 'फेल'
| Edited By: | Updated on: Jan 16, 2021 | 4:56 PM
Share

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधात केलेलं सर्च ऑपरेशन फेल ठरल्याचे समोर आलं (MNS Bangladeshi Search Campaign Pune) आहे. संशयित बांगलादेशी घुसखोर म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिलेले नागरिक हे भारतीय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..

पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसैनिकांनी संशयित बांगलादेशी म्हणून काही जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यानंतर पोलिसांनी सर्व नागरिकांचे मतदान कार्ड आणि आधार कार्ड तपासले. त्यात दोन जण पश्चिम बंगालमधील पांडुवा जिल्ह्यातील आहेत. तर एकजण हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. यावरुन मनसेने पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधात राबवलेली मोहीम फेल ठरल्याचं पाहायला मिळत आहे.

मनसेने काल (22 फेब्रुवारी) मुंबईनंतर पुण्यातही मनसेने बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. सातारा रस्त्यावरील धनकवडी परिसरात मनसैनिकांनी पोलिसांसोबत सर्च ऑपरेशन केलं. यावेळी पुण्यातील मनसे अधिकाऱ्यांनी आठ संशयित बांगलादेशी कुटुंबियांना पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे दोन मतदानपत्र आढळून आले होते.“जर हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही, तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करु,” असा इशारा मनसे शहरप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला (MNS Bangladeshi Search Campaign Pune) होता.

संबंधित बातम्या : 

मुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात

बांगलादेशी घुसखोरांच्या शोधात मनसेची धाड, बोरीवलीत झोपडपट्ट्यांत शोध मोहीम

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.