AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही असंवेदनशीलता नव्हे तर काय? राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी या पत्रातून खासगी डॉक्टरांच्या समस्या मांडल्या आहेत. (Raj Thackeray)

ही असंवेदनशीलता नव्हे तर काय? राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
| Updated on: Sep 14, 2020 | 1:10 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी या पत्रातून खासगी डॉक्टरांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. “खासगी सेवेतील डॉक्टरांना विमाकवच नाकारणे असंवेदनशील आहे. खासगी सेवेतील डाँक्टरांना मृत्यूनंतरही कुटुंबाला 50 लाखाचा विमा मिळायला हवं”, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackerays letter to CM Uddhav Thackeray)

राज ठाकरे पत्रात म्हणतात, “खासगी डॉक्टरांचं शिष्टमंडळ मला भेटलं. त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे. पण त्यांनी सरकारी अनास्था सांगितली, त्याने माझं मन विष्णण्ण झालं. कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने खासगी डॉक्टरांना दवाखाने बंद न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉक्टरांनी व्यवसायाशी बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णसेवा सुरुच ठेवली.

यादरम्यान सरकारने कोव्हिड योद्धे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी मग ते सरकारी असो की खासगी या सर्वांना 50 लाखाचं विमाकवच देण्याचं परिपत्रक सरकारने काढलं. मात्र आता खासगी डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे. हे डॉक्टर खासगी सेवेत होते म्हणून नाकारलं जात असल्याचं कारण दिलं जात आहे. पण मुळात हे विमा कवच केंद्राच्या योजनेप्रमाणे मिळत असताना, राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?”

सरकार जर डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणार असेल, मात्र त्याचवेळी स्वत:ची जबाबदारी विसरणार असेल तर हे चुकीचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून खासगी सेवेतील डॉक्टरांनाही योग्य न्याय द्यावा, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackerays letter to CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या 

Raj Thackeray New Look | क्लीन शेव, सफेद कुर्त्यातील ‘स्टाईल स्टेटमेंट’ बदललं, राज ठाकरे यांचा न्यू लूक

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.