गोवा आणि उत्तर प्रदेशच्या यशानंतर ठाकरे गट गुजरात निवडणूक लढवणार का?; मनसेच्या ‘या’ नेत्याचा ठाकरे गटाला खोचक सवाल

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. गुजरात निवडणुकीवरून त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

गोवा आणि उत्तर प्रदेशच्या यशानंतर ठाकरे गट गुजरात निवडणूक लढवणार का?; मनसेच्या 'या' नेत्याचा ठाकरे गटाला खोचक सवाल
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 2:34 PM

मुंबई :  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. गुजरात निवडणुकीवरून त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करणारा ठाकरे गट गुजरात विधानसभेची निवडणूक लढवणार का? असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. नुकतीच उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मिळालेल्या भव्य यशानंतर ठाकरे गट गुजरात निवडणूक लढवणार की माघार घेणार असा साधा प्रश्न पडल्याचं  संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं संदीप देशपांडे यांनी?

संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे. गुजरात निवडणुकीवरून देशपांडे यांनी ठाकरे गटावर निशाण साधला आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करणारा ठाकरे गट गुजरात विधानसभेची निवडणूक लढवणार का? असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. राऊत साहेब म्हणायचे आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. त्यामुळे आता आम्ही भारतभर निवडणुका लढवणार आहोत. म्हणून मला एक साहाजिकच प्रश्न पडला, गोव्याच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांना जे भव्य यश मिळालं, त्यानंतर ते गुजरात निवडणूक लढवणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘आप’ निवडणुकीच्या रिंगणात

काही दिवसांपूर्वीच पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसला जोरदार धक्का देत मोठं यश मिळवलं होतं. या यशानंतर आता आपने गुजरात विधानसभा निवडणुकीवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. तर दुसरीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडू जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.