ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर पूर्ण विश्वास, मनसेचा आदित्य ठाकरेंना भक्कम पाठिंबा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन भाजपकडून आदित्य ठाकरेंवर करण्यात आलेल्या आरोपांवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे (MNS Leader Bala Nandgaonkar stand on Support of Aaditya Thackeray).

ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर पूर्ण विश्वास, मनसेचा आदित्य ठाकरेंना भक्कम पाठिंबा
Follow us
| Updated on: Aug 13, 2020 | 7:24 PM

uमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते नारायण राणे यांनी उघडपणे टीका केली आहे. मात्र, या प्रकरणावर मनसेने आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे (MNS Leader Bala Nandgaonkar stand on Support of Aaditya Thackeray).

“ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशाप्रकारची गोष्ट झाली असेल, असं वाटत नाही. भाजपच्या आरोपांमुळेच हा वाद सुरु झाला”, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावर यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आदित्य ठाकरे यांना मनसेचं समर्थन असल्याचं उघड झालं आहे (MNS Leader Bala Nandgaonkar stand on Support of Aaditya Thackeray).

सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव नाही : संजय राऊत

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (13 ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेतही उत्तर दिलं. “या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव कुठेही आलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयात वकील कुणाचंही नाव घेऊ शकतात. तिथे 50 वकील उभे आहेत. मोठ्या लोकांची नावं घेतल्याशिवाय त्या प्रकरणाला प्रसिद्धी मिळत नाही, संन्सनाटी निर्माण होत नाही, हे आता अलिकडच्या काळात समीकरण निर्माण झालं आहे. आदित्य ठाकरे यांचं नाव कुणीही कुठेही घेतलेलं नाही, कोर्टात फक्त वृत्तपत्रांमधील काही बातम्यांचा संदर्भ दिला, असं मी ऐकलं”, अंस संजय राऊत म्हणाले.

आदित्य ठाकरेंकडूनही उत्तर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवरुन आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच उत्तर दिलं आहे. “सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन गलिच्छ राजकारण केलं जात आहे. या प्रकरणावरुन ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे”, अशी प्रतक्रिया आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर दिली होती.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

“सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला होता.

“मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

“कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.

“सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दुर्देवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांना कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

“मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल, असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईस या भ्रमात कोणी राहू नये”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता.

संबंधित बातम्या :

ही वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी, सुशांत प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं

सच को सीने से लगाया करते हैं, सुशांतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीसांकडून आणखी एक ट्विट

दिशा सालियनची बलात्कार करुन हत्या, सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय? : नारायण राणे

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.