AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरी ते गटारातच उडी मारणार, बेडकाचा उल्लेख करून महाजनांनी राणेंची उडवली खिल्ली!

प्रकाश महाजन आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महाजन यांनी आता बेडकाचे उदाहरण देत नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

तरी ते गटारातच उडी मारणार, बेडकाचा उल्लेख करून महाजनांनी राणेंची उडवली खिल्ली!
narayan rane and prakash mahajan
| Updated on: Jun 11, 2025 | 3:01 PM
Share

Prakash Mahajan Vs Narayan Rane : मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यातील वादाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलट्या करायला लावेन, अशा शब्दांत सुनावलं होतं. त्यानंतर महाजन यांनीही दंड थोपटत राणे यांना खुले आव्हान दिले होते. आता पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना डिवचलं आहे. त्यांनी बेडकाचे उदाहरण देत राणेंची खिल्ली उडवली आहे.

भाजपाच्या एकाही नेत्याने…

नारायण राणे यांनी काल एक वक्तव्य केलं. प्रकाश महाजन यांना त्यांच्या पक्षाकडून पाठिंबा नाही, असं ते म्हणाले. माझ्यासोबत आमचे महानगरप्रमुख, मनसेचे उपाध्यक्ष बसलेले आहेत. प्रकाश महाजन एकटा आहे. पण नारायण राणे यांच्याकडून भाजपाचं कोणीही बोललेलं का? असा सवाल महाजन यांनी केला. तसेच मला भाजपाच्या कित्येक लोकांनी फोन केला आणि आम्ही या प्रकरणात काय बोलावं? अशी भावाना व्यक्त केली. भाजपाच्या एकाही नेत्याने नारायण राणे यांच्या विधानाची जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी त्यांचं काय चाललंय ते अगोदर पाहावं, असा सल्लाही महाजन यांनी दिला.

बेडकाला सोन्याच्या बाळण्यात बसवलं तरी….

तसेच, पुढे बोलताना बोलताना मी माझ्या पक्षात काय चाललंय ते मी पाहतो, असा सल्लाही महाजन यांनी नारायण राणे यांनी दिला. नारायण राणे यांनी संघाविषयी काय उद्गार काढलेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काय उद्गार काढलेले आहेत. बेडकाला सोन्याच्या बाळण्यात बसवलं तरी ते गटारीतच उडी मारणार, अशा शेलक्या शब्दांत महाजन यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. नारायण राणे यांच्या गुन्ह्यांची यादी विद्यमान मुख्यमंत्र्यांनीच वाचून दाखवलेली आहे. दुसऱ्यांच्या नेत्यांविषयी सन्मानजक बोलायला पाहिजे, असे मत महाजन यांनी व्यक्त केलं.

गल्लीछाप भाषा टाळली पाहिजे

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही प्रकाश महाजन यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. नारायण राणे यांची मुलं ज्या पद्धतीने बोलतात ते योग्य नाही. नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. एवढ्या मोठ्या व्यक्तीचा एक वेगळा स्तर असतो, अशी सणसणीत टीका दानवे यांनी राणे यांच्यावर केली. तसेच त्यांनी तो स्तर टिकवला पाहिजे. गल्लीछाप भाषा बोलणं टाळायला हवं. त्यांचे संस्कारच दिसत नाहीत. आपण वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी मोठ्यांचा आदर केला पाहिजे, असा सल्ला दानवे यांनी नारायण राणे यांना दिला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.