AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gajanan Kale | …मग संजय राऊत अन् सेनेनं काय तुमची धुणीभांडी करायची का? मनसेच्या गजानन काळेंची तुफान टोलेबाजी

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणंच टाळली. कुणी काहीही बोलतं, त्यावर मी बोलणार नाही, अशा शब्दात राऊतांनी पत्रकारांना बोलण्यास नकार दिला.

Gajanan Kale | ...मग संजय राऊत अन् सेनेनं काय तुमची धुणीभांडी करायची का? मनसेच्या गजानन काळेंची तुफान टोलेबाजी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2022 | 11:42 AM
Share

मुंबईः पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल या धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेविरोधात नेहमीच आक्रमक टीका करणारे मनसे नेते गजानन काळेंनीही (Gajanan Kale) हाच धागा पकडत शिवसेनेवर (Shiv Sena) तुफ्फान टोलेबाजी केली. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार म्हटल्यावर संजय राऊत आणि सेनेनं काय तुमची धुणी भांडी करायची का? असा खोचक सवाल गजानन काळेंनी केलाय. साताऱ्यामध्ये धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं तर मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विटरद्वारे यावर प्रतिक्रिया दिली. इकडे संजय राऊतांना याविषयी प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी याविषयी बोलणंच सपशेल टाळलं. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा आणि प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा हक्क आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

सातारा येथील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच वर्ष माझ्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली होती. ती मी उत्तम रितीने निभावली. सत्ताधारी पक्ष कितीही मजबूत असला तरी त्याला गदागदा हलवू शकतो. मी ज्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात काम करतो, तिथं मन लावून काम करेन. त्यामुळे आगामी जे कुणी मुख्यमंत्री असतील, ते आपलेच असतील..  ते म्हणतील हा विभाग आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाला नको… वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय.

गजानन काळेंचं ट्वीट काय?

धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याचा धागा पकडत मनसे नेते गजानन काळेंनी शिवसेनेवर चांगलंच तोंडसुख घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर संजय राऊत आणि सेनेनं काय तुमची धुणीभांडी करायची का, असा सवाल त्यांनी केलाय. हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे आणि तो सहन केला जाणार नाही. खंजीर, कोथळा, वाघनखे, मर्द, मावळासह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा. अर्थात दै. सामना नव्हे टोमणा.. या शब्दात गजानन काळे यांनी संजय राऊतांवर तुफान टोलेबाजी केली.

संजय राऊतांनी प्रतिक्रियाच टाळली

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणंच टाळली. कुणी काहीही बोलतं, त्यावर मी बोलणार नाही, अशा शब्दात राऊतांनी पत्रकारांना बोलण्यास नकार दिला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.