मुख्यमंत्रीसाहेब, वांद्र्याच्या अंगणातील घुसखोर हाकला, 'मातोश्री'समोर मनसेचं पोस्टर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्र्यातील मातोश्री घराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केली (MNS poster outside Matoshree) आहे.

MNS poster outside Matoshree, मुख्यमंत्रीसाहेब, वांद्र्याच्या अंगणातील घुसखोर हाकला, ‘मातोश्री’समोर मनसेचं पोस्टर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्र्यातील मातोश्री घराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केली (MNS poster outside Matoshree) आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमधून थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्यात आलं आहे. वांद्र्यात जे काही बांगलादेशी आणि पाकिस्तानी मोहल्ले, अड्डे आहेत ते साफ करा, असं आवाहन या पोस्टरमध्ये केलं आहे. मनसेचे पदाधीकारी अखिल चित्रे यांनी हे होर्डिंग लावले (MNS poster outside Matoshree) आहे.

मातोश्री बाहेर लावलेल्या पोस्टरमध्येही मनसेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. “माननीय मुख्यमंत्रीसाहेब पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदूस्थानातून हाकलंलच पाहिजे, हीच आपली भूमीका असेल तर प्रथम वांद्र्यातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा”, असं मनसेच्या पोस्टरमध्ये म्हटलं आहे.

MNS poster outside Matoshree, मुख्यमंत्रीसाहेब, वांद्र्याच्या अंगणातील घुसखोर हाकला, ‘मातोश्री’समोर मनसेचं पोस्टर

येत्या 9 फेब्रुवारी रोजी मनसेचा बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरीविरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात मनसेकडून पोस्टरबाजी केली जात आहे. सध्या ही पोस्टरबाजी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

“वांद्र्यात जे बॅनर लागले आहे त्यामध्ये आम्ही कोणतेही आवाहन केले नसून विनंती केली आहे. बांगलादेशींचा मुद्दा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आज तो मुद्दा राज ठाकरे रेटून पुढे नेत आहेत. आपण गेले दहा वर्ष मनसेचा ट्रॅक पाहिला तर दिसेल, जेव्हा कधीही अशाप्रकारच्या गोष्टी निदर्शनास आल्या तेव्हा मनसे त्याविरोधात प्रखरपणे उभी राहिली”, असं मनसे पदाधिकारी अखिल चित्रे म्हणाला.

“रझा अकादमीचा मोर्चा झाला त्याविरोधात मनसे हा एकमेव पक्ष होता ज्याने मोर्चा काढला. तेव्हा स्वत: हिंदुत्व म्हणून बोलणारे शेपूट घालून कुठे गेले होते माहित नाही”, अशी टीकाही अखिल चित्रेंनी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *