महापालिका निवडणुकांआधी राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले…

पालिका निवडणुकांसाठी अजून बराच वेळ आहे. त्याआधी कामाला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेत.

महापालिका निवडणुकांआधी राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले...
| Edited By: | Updated on: Sep 18, 2022 | 12:54 PM

नागपूर : पालिका निवडणुकांसाठी अजून बराच वेळ आहे. त्याआधी कामाला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिलेत. आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे कामात मागे पडू नका. पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागा. विजय आपलाच आहे, असं राज ठाकरे म्हणालेत. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपुरात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तेव्हा त्यांनी नागपूरच्या मनसे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.