पत्री पुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर काम पूर्ण झालं असतं, मनसे आमदार राजू पाटलांची सेनेवर टीका

पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट करुन बाजार मांडला नसता तर काम वेळेत झाले असते, असं राजू पाटील म्हणाले. | MNS MLA Raju Patil

पत्री पुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर काम पूर्ण झालं असतं, मनसे आमदार राजू पाटलांची सेनेवर टीका

ठाणे : पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर आज गर्डरचे काम पूर्ण झाले असते. पुलाच्या कामाचा बाजार मांडला असल्याची घणाघाती टीका मनसे आमदार राजू पाटील  ( MNS MLA Raju Patil)यांनी शिवसेनेवर केलीय. आता मेगाब्लॉक कधी मिळणार ? हा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. कल्याणच्या पत्री पुलावर गर्डर बसवण्याच्या कामाचा आजचा दुसरा दिवस होता. मात्र, 16 मीटर गर्डर ढकलणे बाकी असताना रेल्वेचा मेगाब्लॉक संपला. राजू पाटील यांनी याला शिवसेना नेत्यांना जबाबदार धरले आहे. (MNS MLA Raju Patil criticize Shivsena over delay of Kalyan Patri Bridge Gardere Work)

गर्डरच्या लाँचिंगच्या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर आज गर्डरचे काम पूर्ण झाले असते, असं टीकास्त्र राजू पाटील यांनी शिवसेना नेत्यांवर सोडले. गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण करण्यासाठी आता रेल्वेला पुन्हा मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

गर्डर लाँचिंगवरुन मनसे-शिवसेना आमने सामने

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शनिवारी पत्री पुलाजवळ आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले होते. “पत्री पुलाच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्याचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, अशी टीका राजू पाटील यांनी केली होती. आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली आजोळ आहे. त्यांनी अन्य रखडलेल्या पुलाच्या कामातही लक्ष घालावे”, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
“या पुलाला जोडणारा 90 फुटाच्या रस्ताचा अप्रोच अद्याप अपूर्ण आहे. तो पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकत नाही. त्यामुळे गर्डर टाकून उपयोग नाही. या रस्त्याच्या कामाचा जाब विचारायला आम्ही आयुक्तांना भेटायला आलो होतो. आमची पोलिसांनी अडकवणूक केली, हे चुकीचे आहे”, असा आरोपही त्यांनी केला. (MNS MLA Raju Patil criticize Shivsena over delay of Kalyan Patri Bridge Gardere Work)

गर्डरचे 10 टक्के काम अपूर्ण

पत्री पुलावर गर्डर बसवण्याच्या कामाचा आजचा दुसरा दिवस होता. मात्र, 16 मीटर गर्डर ढकलणे बाकी असताना रेल्वेचा मेगाब्लॉक संपला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गर्डरचे उर्वरित काम उद्या म्हणजेच सोमवारी रात्री होण्यासाठी रेल्वेकडे रात्री अर्धा-अर्धा तासाचा मेगाब्लॉक घेऊन काम संपवण्याची मागणी त्यांनी केली, अशी माहिती कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली

दरम्यान, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांचे म्हणणे आहे की उद्याच्या मेगाब्लॉक संदर्भात अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. या संदर्भात चर्चा सुरु आहे.

संबंधित बातम्या:

पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, आदित्य ठाकरेंनी इतर पुलांच्या कामातही लक्ष घालावं, राजू पाटलांची टीका

पत्रीपूलला हेरिटेजचा दर्जा द्या, मनसे आमदाराज राजू पाटलांची उपरोधिक मागणी

(MNS MLA Raju Patil criticize Shivsena over delay of Kalyan Patri Bridge Gardere Work)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *