पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, आदित्य ठाकरेंनी इतर पुलांच्या कामातही लक्ष घालावं, राजू पाटलांची टीका

"आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली आजोळ आहे. त्यांनी अन्य रखडलेल्या पुलाच्या कामातही लक्ष घालावे", अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, आदित्य ठाकरेंनी इतर पुलांच्या कामातही लक्ष घालावं, राजू पाटलांची टीका

कल्याण : “पत्री पुलाच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्याचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही (MLA Raju Patil Criticize Aaditya Thackeray). आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली आजोळ आहे. त्यांनी अन्य रखडलेल्या पुलाच्या कामातही लक्ष घालावे”, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. “या पुलाला जोडणारा 90 फुटाच्या रस्ताचा अप्रोच अद्याप अपूर्ण आहे. तो पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकत नाही. त्यामुळे गर्डर टाकून उपयोग नाही. या रस्त्याच्या कामाचा जाब विचारायला आम्ही आयुक्तांना भेटायला आलो होतो. आमची पोलिसांनी अडकवणूक केली, हे चुकीचे आहे”, असेही ते म्हणाले. त्यामुळे पत्री पुलावरुन शिवसेना मनसे वाद पेटण्याची शक्यता आहे (MLA Raju Patil Criticize Aaditya Thackeray).

कल्याणमधील पत्री पुलाचे गर्डर लॉचिंगचे काम आज सुरु झाले. दोन दिवस लॉचिंगचे काम होणार आहे. या कामानिमित्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना नगरसेवक पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते.

या पुलासाठी खासदार शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, पूल तयार व्हायला विलंब झाला. आज लॉचिंगचे अर्धे काम झाले आहे. यादरम्यान, कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील हे पुलाजवळ असलेल्या 90 फुटी  रस्त्यावरील अर्धवट असलेल्या अप्रोच रोडची पाहणी करण्यासाठी आले होते.

त्याठिकाणी कशा प्रकारे रस्ता अर्धवट आहे, याचा जाब त्यांनी अभियंत्याला विचारला. तसेच, त्याठिकाणी रस्त्यासाठी भांडणाऱ्या एका जागरुक नागरीक काशीनाथ गुरव यांची भेट घेतली. गुरव यांनी त्यांची व्यथा आमदाराकडे यावेळी मांडली. यावेळी आमदारांनी आयुक्तांना भेटण्याचे ठरविले. आयुक्त हे पत्रीपूलाजवळ थांबले होते. राजू पाटील मनसे कार्यकर्त्यांसोबत पत्रीपूल परिसरात आले (MLA Raju Patil Criticize Aaditya Thackeray).

याठिकाणी पोलिसांनी आमदारांसह कार्यकर्त्यांना अडवले. त्यानंतर त्यांना पुलाजवळ जाण्याची परवानगी दिली गेली. या ठिकाणी आयुक्त नसल्याने मनसे आमदार भडकले. त्यानंतर फोनवर आयुक्तांशी संपर्क साधून आयुक्तांशी बोलणी केली. आता सोमवारी भेट घेतली जाणार आहे.

यावेळी राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि आयुक्तांवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे हे पुलाच्या कामाकरिता कल्याणला आले होते. त्यांनी केवळ पत्री पुलाचे काम न पाहता मोठा गाव ठाकूर्ली माणकोली खाडी पूल, कोपर पूल, पलावा पूल, आंबिवली येथील रेल्वे उड्डाण पुलाचे कामंही मार्गी लावावे, अशी जोरदार टीका राजू पाटील यांनी केली आहे.

MLA Raju Patil Criticize Aaditya Thackeray

संबंधित बातम्या :

राज ठाकरे म्हणतात पोलिसांचा सन्मान करा, सौजन्याने वागा, पण आता सौजन्याची ऐशी-तैशी, आमदार राजू पाटील भडकले

विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट

पत्रीपूलला हेरिटेजचा दर्जा द्या, मनसे आमदाराज राजू पाटलांची उपरोधिक मागणी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *