राज ठाकरे म्हणतात पोलिसांचा सन्मान करा, सौजन्याने वागा, पण आता सौजन्याची ऐशी-तैशी, आमदार राजू पाटील भडकले

मनसे आमदार राजू पाटील वाहतूक पोलिसांवर भडकले आहेत (MNS MLA Raju Patil angry on traffic police).

राज ठाकरे म्हणतात पोलिसांचा सन्मान करा, सौजन्याने वागा, पण आता सौजन्याची ऐशी-तैशी, आमदार राजू पाटील भडकले

ठाणे : मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी यासाठी ‘मनसे वाहतूक सौजन्य सप्ताह’ राबविला. त्यांच्या या प्रयत्नानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वाहतूक पोलीस पैसे घेऊन अवजड वाहनांना सोडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राजू पाटील वाहतूक पोलिसांवर भडकले आहेत (MNS MLA Raju Patil angry on traffic police).

राजू पाटील यांनी वाहतूक पोलिसांविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांचा सन्मान करावा, असं सांगितलं आहे. मात्र जे चुकीचे आहे, त्यावर बोललेच पाहिजे. त्यामुळेच आता आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. आम्ही आतापर्यंत खूप सौजन्य दाखवलं. पण आता यापुढे सौजन्याची ऐशी-तैशी, आता वाहतूक पोलिसांविरोधात उग्र आंदोलन करणार”, असं राजू पाटील यांनी सांगितलं.

अनलॉक सुरु झाल्यावर सर्व कार्यालये उघडली. चाकरमानी ठाणे, मुंबई, नवी मुंबईला जाण्यासाठी निघाले. रेल्वे बंद असल्याने सगळा ताण रस्ते वाहतूकीवर पडतोय. कल्याण शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. लोक तासंतास वाहतूक कोंडीत अडकून राहतात (MNS MLA Raju Patil angry on traffic police).

वाहतूक कोंडीला प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक रस्त्याचे सुरु असलेले काम आणि दुसरे अवजड वाहने. सकाळी आणि संध्याकाळी अवजड वाहनांना बंदी असताना वाहतूक पोलीस पैसे घेऊन वाहन चालकांना प्रवेश देत आहेत. इतकेच नाही तर बोगस टोईंग पावत्या फाडल्या जात आहे, असा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

संबंधित बातमी : चार-पाच तास वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण, पोलीसही हतबल, अखेर मनसे आमदाराकडून पुढाकार

Published On - 5:21 pm, Sun, 8 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI