“अस्मिता महत्वाची की लाचारी ते ठरवा” नितीन नांदगावकरांना संदीप देशपांडेंचा टोला

| Updated on: Jul 23, 2020 | 8:32 AM

नितीन नांदगावकर यांना सोमवारी अज्ञात नंबरवरुन फोन आला. त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती

अस्मिता महत्वाची की लाचारी ते ठरवा नितीन नांदगावकरांना संदीप देशपांडेंचा टोला
Follow us on

मुंबई : परप्रांतीयांविरोधातील आंदोलनांसाठी ओळखले जाणारे शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “अस्मिता महत्वाची की लाचारी ते नांदगावकर यांनी ठरवावं” असं ट्वीट देशपांडे यांनी केलं आहे. (Sandeep Deshpande taunts Nitin Nandgaonkar)

नितीन नांदगावकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. आक्रमक भूमिका, परप्रांतीयांविरोधातील आंदोलन आणि सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा म्हणून नितीन नांदगावकर यांची ओळख आहे.

नितीन नांदगावकर यांना सोमवारी अज्ञात नंबरवरुन फोन आला. त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याची तक्रार त्यांनी नेहरुनगर पोलीस ठाण्यात दिली होती.

“मी तीन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने हिरानंदानी रुग्णालयात गेलो होतो, कोरोनाग्रस्त रिक्षाचालकाचा मृतदेह ताब्यात देण्याबाबत आणि कुटुंबाला दिलेले बिल कमी करण्याबाबत जाब विचारला होता. तेव्हा माझा तिथल्या सुरक्षा रक्षकांशी वाद झाला. त्यावेळी रुग्णालयाचे सीईओ सुदीप चटर्जी यांनी मला दम देऊन आठ लाख रुपये भरा आणि मृतदेह घेऊन जा, असे सांगितले होते.” असे नांदगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मनसेला जबर धक्का, आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत

मी संबंधित रिक्षाचालकाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यावेळी माझी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की झाली. मला सोमवारी सकाळी मोबाईलवर धमकी देणारा फोन आला. तसेच मला शिवीगाळ करण्यात आली” असा आरोप नितीन नांदगावकर यांनी केला आहे.

“अस्मिता महत्वाची की लाचारी ते नितीन नांदगावकर यांनी ठरवावं” असं ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज सकाळी केलं. याला नांदगावकर यांना आलेल्या धमकीची पार्श्वभूमी असल्याचे मानले जात आहे.

कोण आहेत नितीन नांदगावकर?

परप्रांतीय रिक्षाचालकांकडून होणाऱ्या प्रवाशांच्या अडवणुकीविरोधात नितीन नांदगावकर यांच्याकडून नेहमी आक्षेप घेतला जायचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षात असलेल्या नांदगावकर यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी रातोरात शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस होते.

नांदगावकर हे आपल्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेसाठी ओळखले जातात. आपल्या फेसबुक पेजवर ते अनेकदा परप्रांतीयांविरोधातले व्हिडीओ शेअर करत असतात. पोलिसांनी नांदगावकरांना मुंबई, उपनगरं आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई केली होती. (Sandeep Deshpande taunts Nitin Nandgaonkar)