नितीन नांदगावकरांच्या धक्कादायक सेनाप्रवेशावर मनसे नेते अविनाश जाधव म्हणतात…

नितीन नांदगावकर हे पक्षाचे एक चांगले कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी निर्णय घेण्यात खूप घाई केली, असं मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केलं

नितीन नांदगावकरांच्या धक्कादायक सेनाप्रवेशावर मनसे नेते अविनाश जाधव म्हणतात...
Follow us
| Updated on: Oct 08, 2019 | 11:25 AM

मुंबई : नितीन नांदगावकर यांनी निर्णय घेण्यात खूप घाई केली. त्यांना भविष्यात याची नक्की जाणीव होईल, असं मत ठाणे-पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ठाणे शहराचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव (Avinash Jadhav on Nitin Nandgaonkar) यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या आठवड्यात नांदगावकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता.

नितीन नांदगावकर हे पक्षाचे एक चांगले कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी निर्णय घेण्यात खूप घाई केली. त्यांना काही अडचणी होत्या तर त्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असंही अविनाश जाधव (Avinash Jadhav on Nitin Nandgaonkar) म्हणाले.

राज ठाकरे यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही, राज ठाकरे दैवत आहेत आणि राहतील. मात्र त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला, असा दावा नितीन नांदगावकर यांनी पक्ष सोडताना केला होता.

मनसेला जबर धक्का, आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत

मनसेच्या वाहतूक शाखेच्या सरचिटणीसपदी असलेल्या नितीन नांदगावकर यांनी 2 ऑक्टोबरला रात्री शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे संभाव्य उमेदवार मानले जात असताना तिकीट कापल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा होती.

‘मातोश्री’ या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता.

कोण आहेत नितीन नांदगावकर?

परप्रांतीय रिक्षाचालकांकडून होणाऱ्या प्रवाशांच्या अडवणुकीविरोधात मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांच्याकडून नेहमी आक्षेप घेतला जायचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून नांदगावकर हे पक्षात आहेत.

मनसेच्या ‘डॅशिंग’ नेत्या रुपाली पाटील उमेदवारी डावलल्याने आक्रमक

नांदगावकर हे आपल्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेसाठी ओळखले जातात. आपल्या फेसबुक पेजवर ते अनेकदा परप्रांतीयांविरोधातले व्हिडीओ शेअर करत असतात. पोलिसांनी नांदगावकरांना मुंबई, उपनगरं आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई केली होती.

संबंधित बातम्या :

समाजकंटकांना पोलिस ठोकणार की मी ठोकू? मनसे नेते नितीन नांदगावकरांचा सवाल

बटणाने टॅक्सीचं मीटर फास्ट, मनसे नेते नांदगावकरांचा दावा, टॅक्सी फोडण्याचाही इशारा

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.