मनसेच्या 'डॅशिंग' नेत्या रुपाली पाटील उमेदवारी डावलल्याने आक्रमक

रुपाली पाटील या मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या पुणे महापालिकेतील माजी नगरसेविका आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा, तर पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत.

मनसेच्या 'डॅशिंग' नेत्या रुपाली पाटील उमेदवारी डावलल्याने आक्रमक

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर पुण्यातून नाराजी व्यक्त होत आहे. पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे (MNS Rupali Patil Angry) उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाटील मुंबईत आल्या आहेत.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक होत्या. मात्र या ठिकाणी अजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे रुपाली पाटील नाराज असल्याची माहिती आहे.

कसबा पेठ मतदारसंघातून महायुतीतर्फे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक मैदानात उतरणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार ठरल्यावर कसबा पेठेत तिहेरी सामना पाहायला मिळू शकला असता.

कोण आहेत रुपाली पाटील?

रुपाली पाटील या मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या पुणे महापालिकेतील माजी नगरसेविका आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा, तर पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत.

मनसेच्या रुपाली पाटील यांना गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश

रुपाली पाटील सध्या मुंबईत आलेल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलून (MNS Rupali Patil Angry) दुपारपर्यंत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. आधीच मनसेची स्थिती फारशी बरी नसताना पक्षांतर्गत धुसफूस आणि बंडाळीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

रुपाली पाटील यांना गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले होते. त्यांच्याविरोधात हिंजवडी, खडक, बिबवेवाडी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा दाखला देत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी रुपाली पाटील यांच्या नावाने नोटीसही जारी केली होती.

लोकसभा निवडणुकांपूर्वी रुपाली पाटली यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. स्मृती इराणी यांच्या सर्व शिक्षणाच्या पदव्या या खोट्या आहेत, असा आरोप पाटील यांनी केला होता.

ठाकरे घराण्याला इतिहास रचण्यासाठी राज ठाकरेंची साथ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी 27 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी काल जाहीर केली. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा मतदारसंघातून निवडणूक लढतील, तर शिवसेनेतून मनसेत आलेले नाशिकमधील नगरसेवक दिलीप दातीर यांनाही नाशिक पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, माहिम मतदारसंघातून नितीन सरदेसाई यांचा पत्ता कट झाला आहे. या ठिकाणी संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवडीतून तीन वेळा आमदार राहिलेल्या बाळा नांदगावकर यांचंही यादीत नाव नाही. आपल्याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, असं नांदगावकर म्हणाले आहेत.

मनसेचे 27 उमेदवार

 1. प्रमोद पाटील – कल्याण ग्रामीण
 2. प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम
 3. अशोक मुर्तडक – नाशिक पूर्व
 4. संदीप देशपांडे – माहिम
 5. वसंत मोरे – हडपसर
 6. किशोर शिंदे – कोथरुड
 7. नितीन भोसले – नाशिक मध्य
 8. राजू उंबरकर – वणी
 9. अविनाश जाधव – ठाणे
 10. नयन कदम – मागाठाणे
 11. अजय शिंदे – कसबा पेठ, पुणे
 12. नरेंद्र धर्मा पाटील – सिंदखेड
 13. दिलीप दातीर – नाशिक पश्चिम
 14. योगेश शेवेरे- इगतपुरी
 15. कर्णबाळा दुनबळे – चेंबूर
 16. संजय तुर्डे – कलिना
 17. सुहास निम्हण – शिवाजीनगर
 18. गजानन काळे – बेलापूर
 19. अतुल बंदिले – हिंगणघाट
 20. प्रशांत नवगिरे – तुळजापूर
 21. राजेश वेरुणकर – दहीसर
 22. अरुण सुर्वे – दिंडोशी
 23. हेमंत कांबळे – कांदिवली पूर्व
 24. वीरेंद्र जाधव – गोरेगाव
 25. संदेश देसाई – वर्सोवा
 26. गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम
 27. अखिल चित्रे- वांद्रे पूर्व
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *