मनसेच्या रुपाली पाटील यांना गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश

मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे (Rupali patil thombare) यांना गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत. पोलिसांनी रुपाली पाटील यांना दिलेल्या आदेशामुळे मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मनसेच्या रुपाली पाटील यांना गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश

पुणे : मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे (Rupali patil thombare) यांना गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत. पोलिसांनी रुपाली पाटील यांना दिलेल्या आदेशामुळे मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रुपाली पाटील यांना 13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत झोन एकच्या हद्दीत राहण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे (Rupali patil thombare) यांच्याविरोधात हिंजवडी, खडक, बिबवेवाडी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा दाखला देत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या नावाने नोटीसही जारी केली आहे.

राजकीय हेतूने नोटीस पाठवली आहे, असा आरोप रुपाली पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. नुकतेच काहीदिवसांपूर्वी रुपाली पाटली यांनी डीजे प्रकरणावरुन चंद्रकांत दादांना गणेश मंडळाचे अध्यक्ष व्हावं, असं आव्हान केलं होते.

मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून रुपाली पाटील यांना ओळखलं जाते. रुपाली पाटील या पुणे महानगरपालिकेत नगरसेविकाही होत्या. नुकतेच लोकसभा निवडणुकांपूर्वी रुपाली पाटली यांनी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. स्मृती इराणी यांच्या सर्व शिक्षणाच्या पदव्या या खोट्या आहेत, असा आरोप पाटील यांनी केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *