AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… म्हणून आजपासून ‘सामना’ बंद बंद बंद, मनसेची आक्रमक मोहीम

शिवसेनेकडून मनसेवर जोरदार टीका होत आहे. यालाच प्रत्युत्तर म्हणून मनसे देखील आक्रमक झालेली दिसत आहे (MNS campaign against Saamana Newspaper).

... म्हणून आजपासून ‘सामना’ बंद बंद बंद, मनसेची आक्रमक मोहीम
| Updated on: Jan 25, 2020 | 6:07 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या स्थापनेनंतर पहिलंच अधिवेशन घेत पक्षाचा झेंडा बदलला. तसेच पुढील काळात मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. यानंतर शिवसेनेकडून मनसेवर जोरदार टीका होत आहे. यालाच प्रत्युत्तर म्हणून मनसे देखील आक्रमक झालेली दिसत आहे (MNS campaign against Saamana Newspaper). मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी थेट ‘सामना बंद’ची मोहीम सुरु केली आहे.

अमेय खोपकर यांनी एक ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “23 जानेवारी 1989 रोजी ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र सुरु झाले. त्या दिवसापासून आजतागायत आमच्या घरी नियमित ‘सामना’ येत होता. आम्ही पत्रकारांनी केलेली टीका समजू शकतो, पण रडत राऊतजी आता आगपाखड करत आहेत. त्याचा निषेध म्हणून आजपासून ‘सामना’ बंद बंद बंद.”

ज्यांनी गेल्या काही महिन्यात झेंडे आणि अजेंडे बदलले त्यांनी दुसऱ्याच्या झेंड्यावर बोलूच नये. आमचा महाराष्ट्र धर्म तितकाच कडवा आहे. तुमच्यासारखी दिल्लीश्वरांपुढे आम्ही निष्ठा गहाण टाकली नाही. भसाभसा अग्रलेख खरडले म्हणजे तुम्ही काही थोर होत नाही. महाखिचडीची सत्ता हातून गेली की ढसाढसा रडू नका म्हणजे झालं, असं म्हणत खोपकर यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलं आहे?

“मनसे प्रमुखांना त्यांचे मुद्दे माडंण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका आणि त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडेलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मुळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे आणि हे त्यांचे खेळ जुनेच आहेत”, असे अग्रलेखात म्हटले आहे.

“वीर सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्याचां खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्याचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्त्वाचाच आहे”, अशा शब्दात शिवसेनेने मनसेवर टीका केली.

“देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलुन द्या. नव्हे हाकलायलाच पाहीजे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यासाठी एका राजकीय पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे,” अशी टीकादेखील शिवसेनेने केली आहे.

संबंधित बातम्या:

दोन झेंडे म्हणजे घसरलेल्या गाडीचे लक्षण, झेपेल तर करा, ‘सामना’तून मनसेवर टीका

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरण्यावरुन मनसे आणि शिवसेनेत ठिणगी

MNS campaign against Saamana Newspaper

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.