मॉब लिंचिंग हा विदेशी शब्द, आमच्या देशात असं काही नाही, छोट्या मोठ्या घटना होतात : मोहन भागवत

घाच्या पथसंचलनानंतर मार्दर्शन करताना मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.

मॉब लिंचिंग हा विदेशी शब्द, आमच्या देशात असं काही नाही, छोट्या मोठ्या घटना होतात : मोहन भागवत
Follow us
| Updated on: Oct 08, 2019 | 12:12 PM

 RSS Dusshera  नागपूर : जमावाकडून मारहाण अर्थात मॉब लिंचिंग (Mohan Bhagwat on mob lynching) हा विदेशी शब्द आहे. आमच्या देशात असं काही नाही. छोट्या मोठ्या घटना होतात, त्यांच्यावर कायद्यांनं कारवाई होते.  मॉब लिंचिंग बाहेरुन (Mohan Bhagwat on mob lynching) आलेले शब्द आपल्यावर थोपतात आणि देशाला बदनाम करतात, असा आरोप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. संघाच्या पथसंचलनानंतर मार्दर्शन करताना मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.

मॉब लिंचिंग एका समुदायातील काही लोकांनी दुसऱ्या समाजातील काही लोकांवर आक्रमण करण्याच्या घटना पुढे येत आहेत. पण यात दोन्हीकडून हल्ले झालेत हे नाकारता येणार नाही. मॉब लिंचिंग हे शब्द बाहेर देशातील काही धर्मग्रंथातून आले आहेत. देशात एकमेकांमध्ये भांडण लावण्याचे षडयंत्र सुरू आहे. यात अनेकदा संघाचा सहभाग असल्याचा आरोप केला जातो.  मात्र संघ अशा विषयात कधीच पडत नाही, असं मोहन भागवत म्हणाले.

गेल्या वर्षी ‘मॉब लिंचिंग’ हा नवीन शब्द आला.  दोन गटात काही वाद झाले असतील तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या  देशातील काही शक्ती आपल्या देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असं मोहन भागवत यांनी नमूद केलं.

बेकायदा काम करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.  गरज असल्यास कठोर कायदा करायला हवा.- स्वयंसेवक सत्तेत आहेत, ते हे करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काही मतभेद असेल, तर संवाद करुन सोडावयला हवेत, असा सल्ला त्यांनी दिला.

मंदीची चिंता नाही जगात मंदी आहे, देशात ग्रोथ रेट झिरोच्या खाली गेल्यावर मंदी असते, आपला ग्रोथ रेट (विकास दर) तर पाचच्या आसपास आहे, मग चिंता कशाची? आर्थिक स्थितीबाबत सरकारने उपाययोजना केल्या आहेत. फक्त सरकारच करणार नाही, सर्वसामान्यांनाही करावं लागेल, असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

सध्याच्या आर्थिक स्थितीतून नक्की बाहेर पडू, तसे लोक आपल्याकडे आहेत. देशात उद्योगासाठी निधी कमी पडला तर विदेशी गुंतवणुकीचे प्रयत्न सुरु आहेत. जगात आलेल्या मंदीचा आपल्या देशावर फारसा परिणाम होत नाही, तशी व्यवस्था आपल्याकडे आहे.  रोजगार वाढवल्यानं लोकांच्या हातात पैसे येतात आणि तो पैसा बाजारात जातो, असं ते म्हणाले.

आम्ही संघाचे लोक स्वदेशीवाले लोक आहेत. स्वदेशी म्हणजे रोजच्या जीवनातली देशभक्ती. आपल्या देशात होत असेल, तर मग त्या वस्तू विदेशातून का आणाव्यात?, असा सवाल मोहन भागवत यांनी केला.

महिला सुरक्षेला प्राधान्य आपल्या देशात मातृशक्ती/ महिला ना घरी सुरक्षित आहे, ना बाहेर सुरक्षित आहे. ही लाजीरवाणी बाब आहे. महिलांना स्वतंत्रता देणं गरजेचं आहे.  देशातील महिलांबाबत संघ स्वयंसेवकांनी सर्वेक्षण केलं, त्यावर संघ काम करणार, असं  मोहन भागवत म्हणाले.

संघाचे लोक दूर जावे म्हणून अपप्रचार होतात. आपल्या दुष्कर्मात यशस्वी होत नसेल तर संघाला बदनाम केले जाते. हे आता इम्रान खान सुद्धा करायला लागला आहे. हिंदूचं संघटन करणे म्हणजे मुस्लीमांचा विरोध करणे असं होत नाही. हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे हे संघाच्या जन्मापासूनच संघ म्हणतो.  2009 पासून संघाची शक्ती वाढली, पूर्वी 2009 मध्येही मी बेलायचो, पण एवढे लोक ऐकायला आले नव्हते, आता येतात कारण संघाची शक्ती वाढली.

कलम 370

या वर्षाला आपण बरेच वर्षे लक्षात ठेऊ अशा घटना या वर्षात घडल्या. 2019 ची लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली. 2014 ला देशात झालेला बदल झाला, कारण आधीच्या सरकारवर नाराजी होती. 2019 ची निवडणूक शांततेत पार पडली. लोकशाही ही आपल्या देशाची परंपरा आहे. बाहेरच्या देशानं आपल्याला लोकशाही दिली असं नाही, असं मोहन भागवत म्हणाले.

केंद्र सरकारला देशातील जनतेनं पुन्हा निवडलं. कलम 370 रद्द केलं. यामुळे साहसी शक्तीचं प्रदर्शन झालं. ही देशात बऱ्याच वर्षांची मागणी होती. जनसंघाची कलम 370 हटवा ही पहिली मागणी होती. कलम 370 हटवल्यानं केंद्र सरकारचं कौतुक, असं मोहन भागवत म्हणाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.