AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे- मोदी वैयक्तिक भेटीवर 5 तासांनी अशोक चव्हाण बोलले, म्हणाले…

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

ठाकरे- मोदी वैयक्तिक भेटीवर 5 तासांनी अशोक चव्हाण बोलले, म्हणाले...
अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री
| Edited By: sagar joshi | Updated on: Jun 08, 2021 | 6:51 PM
Share

मुंबई : मराठा आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. पंतप्रधान आणि महाराष्ट्रातील 3 बड्या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकांतात अर्धा तास चर्चा झाली. त्याबाबत राज्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं चव्हाण म्हणाले. (Ashok Chavan’s reaction on meeting Between CM Thackeray and PM Modi)

कोणत्याही आरक्षणाला ५० टक्के मर्यादा घालून देण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली की आपण आवश्यक घटनादुरुस्ती करुन सकारात्मक पावलं उचला. विहित कायदेशीर मार्गाने केंद्र सरकारने हा विषय हाताळावा अशी विनंती आम्ही केल्याचं चव्हाण म्हणाले. फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं आहे.

‘फडणवीसांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं’

पंतप्रधान मोदींसोबत आज झालेल्या भेटीबाबत ज्या संघटना विरोधी वक्तव्य करत आहेत, त्या भाजपप्रणित आहेत. विरोधकांनीही आपलं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जावं आणि बाजू मांडावी, असं आव्हान चव्हाण यांनी भाजपला आणि काही संघटनांना दिलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं चव्हाण म्हणाले. तसंच ही भेट राजकीय तडजोडीसाठी नव्हती. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं. त्यांना उलट आनंद वाटला पाहिजे, असा टोलाही चव्हाण यांनी लगावलाय.

संजय राऊतांचाही भाजप नेत्यांना टोला

मोदी आणि ठाकरे यांच्यात अर्धा तास झालेल्या वैयक्तिक भेटीबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनीही भाजप नेत्यांना टोला हाणलाय. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्येही एकांतात झालेल्या चर्चेनंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशावेळी चर्चा तर होणारच, अशा शब्दात राऊतांनी विरोधकांना टोला लगावलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कुणाच्याही मध्यस्तीशिवाय महाराष्ट्राच्या प्रश्नात लक्ष घातलं हे महत्वाचं असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विषयांबाबत पंतप्रधान मोदींचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांना या भेटीचे राजकीय संदर्भ काढायचे असतील त्यांनी काढावेत. केंद्र आणि राज्यात संघर्ष नसावा, राज्यांच्या संकटकाळात केंद्राने, पंतप्रधानांनी मदत करावी. राज्यात आणि केंद्रात सुसंवाद असावा ही राज्याची भूमिका आहे. दरम्यान आत पंतप्रधान मोदींनी 1 तास महाराष्ट्राचे प्रश्न ऐकून घेतले तर संघर्षाची भाषा कशाला, असंही राऊत म्हणाले. आता महाराष्ट्राचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशाही संजय राऊत यांनी मोदी-ठाकरेंच्या भेटीनंतर व्यक्त केलीय.

संबंधित बातम्या :

मोदी-ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली असेल तर स्वागतच, या भेटीचा राज्याला फायदाच होईल: फडणवीस

‘उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय तडजोडीसाठी’, खासदार उदयनराजेंचा आरोप

Ashok Chavan’s reaction on meeting Between CM Thackeray and PM Modi

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...