आधी लोकसभेत मोदी सरकारवर आसूड, आता पवारांचा ‘खास मोहरा’ राकेश टिकैत यांची भेट घेणार

खासदार अमोल कोल्हे गुरुवारी दिल्लीतील शेतकऱ्यांची आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार आहेत. | Mp Amol kolhe Will Meet Delhi Farmer And Rakesh Tikait

आधी लोकसभेत मोदी सरकारवर आसूड, आता पवारांचा 'खास मोहरा' राकेश टिकैत यांची भेट घेणार
अमोल कोल्हे आणि शरद पवार
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 3:24 PM

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं जोरदार भाषण राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी लोकसभेत ठोकलं. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना (AMol Kolhe Speech in Loksabha) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांची डॉ. कोल्हे भेट घेऊन त्यांच्या व्यथा समजावून घेणार आहेत. (Mp Amol kolhe Will Meet Delhi Farmer And Rakesh Tikait)

“अत्यंत दुर्दैवी आहे की देशातील शेतकऱ्यांना या पद्धतीने आपल्या हक्कांसाठी आंदोलन करावे लागत आहे. तसंच त्या आंदोलनाची देशाच्या प्रमुखाकडूनच दुर्दैवी चेष्टा केली जाते. हे आंदोलन बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. त्यांना खालिस्तानी देशद्रोही म्हटले जातंय, पण सरकारने हे लक्षात ठेवावं की सत्ता येते जाते पण बळीराजा काय तुम्हाला आम्हाला पोसण्यासाठी काबाड कष्ट करत असतो. आपण दोन घास खावेत म्हणून तो राबत असतो. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घ्या. एक पाऊल पुढे टाका”, असं आवाहन डॉ. कोल्हे यांनी केलं.

अमोल कोल्हे राकेश टिकैत यांना भेटणार

गुरुवारी आम्ही शेतकऱ्यांना भेटायला जाणार आहोत, असं सांगत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे सांगायला त्यांना भेटायला जाणार आहे. त्यामध्ये राजकीय हेतू कोणता नाही, असंही कोल्हे यांनी सांगितलं.

देशाचे प्रमुख शेतकऱ्यांची थट्टा करतात हे देशाचं दुर्दैव

शेतकऱ्यांच्या फायद्याचे हे कायदे आहेत, असं सरकार सांगते पण हे कायदे जर फायद्याचे असते तर शेतकऱ्यांनी आंदोलन का केले असते? हे सरकारने समजून घ्यायला हवं. सरकारने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर हा चेष्टेचा विषय होऊ नये. देशाचे प्रमुख जेव्हा आंदोलनजीवी सारखा शब्द वापरतात हे या देशाचे दुर्दैव असल्याची घणाघाती टीका कोल्हे यांनी मोदींवर केली.

सरकारने केलेला कायदा उद्योगपतींच्या हिताचा

आंदोलन चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा. शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न समजून घ्यायला हवा. ठराविक मूठभर उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी हे सरकार वागत आहे. त्यामुळे हा असंतोषाचा भडका एक दिवस नक्की उडेल, असं कोल्हे म्हणाले.

सेलिब्रेटींनी केलेले ट्विट मानवतेतून

जेव्हा परदेशात हाऊडी मोदी ऐकायला मिळतं तेव्हा आम्ही टाळ्या वाजवायच्या. ज्यावेळेस परदेशातील कोणी मानवतेच्या दृष्टीने ट्विट करतात त्याला आम्ही विरोध करायचा हे योग्य नाही. ज्या ठिकाणी जय जवान जय किसान घोषणा होती तिथे जवान विरुद्ध किसान परिस्थिती तयार करण्यात आली आहे, असा आरोप कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

(Mp Amol kolhe Will Meet Delhi Farmer And Rakesh Tikait)

हे ही वाचा :

तडफदार भाषणानंतर अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, पी. चिदंबरम, सुप्रिया सुळेही उपस्थित!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.