एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन, हे बरोबर आहे का? संभाजीराजेंचा सवाल

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये पार पडलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीवर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टीका केली. तसंच राज्य सरकारलाही सवाल केलाय.

एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन, हे बरोबर आहे का? संभाजीराजेंचा सवाल
अशोक चव्हाण यांच्या आंदोलनातील गर्दीवर संभाजीराजे यांचा सवाल

मुंबई : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन आज काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. त्यात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये पार पडलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीवर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टीका केली. तसंच राज्य सरकारलाही सवाल केलाय. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या आंदोलनात अशोक चव्हाण बैलगाडीवर स्वार झाल्याचं पाहायला मिळालं. (MP Sambhaji Raje questions Thackeray government over large crowd in the agitation in Nanded)

अशोक चव्हाण यांच्या आंदोलनावर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरुन टीका केलीय. तसंच राज्य सरकारलाही सवाल केलाय. एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन…त्यात ते म्हणताय विराट मोर्चा झाला, जोरदार आंदोलन पार पडले अणि त्यात सहभागी झालेल्या जेष्ट नागरिक आणि लहान मुलांचे आभार मानले. आता हे बरोबर आहे का? असा प्रश्न संभाजीराजे यांनी केलाय.

‘केंद्र सरकारनं झोपेचे सोंग घेतल्यानं जनता त्रस्त’

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं झोपेचे सोंग घेतलं आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झालीय. या सरकारला जागं करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असला तरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. युपीए सरकारच्या कार्यकाळात 1-2 रुपयांची जरी पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तर विरोधी पक्ष म्हणून भाजप मोठ्या प्रमाणात टीका करत होते. त्यांनी त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतही मोठा गोंधळ घातला होता. आता मात्र, पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत. तर डिझेलचे दरही वाढले आहेत. असं असूनही केंद्र सरकार झोपेचं सोंग घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय.

संबंधित बातम्या : 

सायकलवरून राजभवनात पोहोचले काँग्रेस नेते, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यपालांना निवेदन

महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली काय?, राऊतांचा घणाघात

MP Sambhaji Raje questions Thackeray government over large crowd in the agitation in Nanded

Published On - 7:07 pm, Thu, 15 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI