AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायकलवरून राजभवनात पोहोचले काँग्रेस नेते, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यपालांना निवेदन

मोदी सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपले आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. 

सायकलवरून राजभवनात पोहोचले काँग्रेस नेते, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यपालांना निवेदन
nana patole
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Jul 15, 2021 | 4:12 PM
Share

मुंबई : काँग्रेसने नेते आज सायकलवरून राजभवनात पोहोचले असून, इंधन दरवाढ, महागाई, काळे कृषी कायदे, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यपालांना निवेदन देण्यात आलंय. केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला आर्थिक कमजोर करत आहे. कोरोनामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असताना महागाईच्या ओझ्याखाली गोरगरीब, मध्यमवर्ग, नोकरदारही पिचला गेलाय. इंधनावरील कराच्या रूपाने केंद्र सरकार आपली झोळी भरत असून, दररोजच्या महागाईने जनतेचे मात्र कंबरडे मोडलेय. मोदी सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपले आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

काँग्रेस नेत्यांकडून सायकल रॅलीने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांनी आज मलबार हिल येथील हँगिंग गार्डन येथून सायकल रॅलीने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. इंधन दरवाढ, महागाईबरोबरच, मराठा, ओबीसी आरक्षण आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना निवदेन दिले.

भारतात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती दररोज वाढत्याच

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असतानाही भारतात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती दररोज वाढत आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. शेजारच्या राष्ट्रांना भारत पेट्रोल, डिझेल 30 रुपये लिटरने देत असून, आपल्याच नागरिकांना मात्र पेट्रोलसाठी 107 रुपये तर डिझेलसाठी 96 रुपये मोजावे लागतात. इंधनावरील एक्साईज ड्युटी, रस्ते विकास सेस व कृषी सेसच्या माध्यमातून केंद्र सरकार भरसाठ कमाई करत आहे. सेसमधून राज्य सरकारला एक रुपयाही मिळत नाही. गत 7 वर्षात इंधनावरील करातून मोदी सरकारने तब्बल 25 लाख कोटी रुपयांची नफेखोरी केलीय.

केंद्रातील भाजपा सरकार जनतेला काहीच दिलासा देत नाही

इंधनाचे भाव दररोज वाढत असताना त्यातून केंद्रातील भाजपा सरकार जनतेला काहीच दिलासा देत नाही, उलट भारतीय जनता पक्षाचे नेते राज्य सरकारने कर कमी करावेत, असा उफराटा सल्ला देत आहेत. राज्य सरकारचे इंधनावरील कर हे केंद्र सरकारपेक्षा फारच कमी आहेत. केंद्र सरकार कररुपाने आपली तिजोरी भरत आहे. उलट राज्य सरकारच्या हक्कांचा जीएसटी परतावाही केंद्र देत नसतानाही इंधन दरवाढीतून जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर ढकलणे ही भाजपाकडून केली जाणारी दिशाभूल आहे.

काँग्रेसचे बडे नेते उपस्थित

यावेळी विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. कुणाल पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, आ. अमिन पटेल,  आ. झिशान सिद्दीकी, आ. अभिजित वंजारी, आ. राजेश राठोड, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, अनिस अहमद, सरचिटणीस राजन भोसले, प्रा. प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध

इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात प्रदेश काँग्रेस राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करत आहे. महसूल विभागीय आयुक्त मुख्यालयी सायकल रॅली काढण्यात आली, महिला काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून महागाईचा निषेध केला. जिल्हा, तालुका स्तरावरही आंदोलन करुन सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली. युवक काँग्रेस, एनएसयूआय, सर्व फ्रंटल व सेलच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या आंदोनात सहभाग घेतला. 7 जुलैपासून सुरू असलेले हे आंदोलन 17 जुलैपर्यंत चालू राहणार आहे.

संबंधित बातम्या

SEBC Category : एसईबीसी प्रवर्गातील नियुक्त्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचा महत्वाचा निर्णय

शिथिलतेबाबत सरकार सकारात्मक, हॉटेल चालक, व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी विचार सुरु – अस्लम शेख

Congress leader reached Raj Bhavan by bicycle, statement to Governor on Maratha-OBC reservation issue

Follow Us
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...