AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकलमध्ये हे काय घडलं? तिकीट नसल्याने टीसीने लाथ घातली, ट्रेनमधून ढकललं? तक्रार समोर येताच…

मुंबईतील सचिन कुमार मौर्य नावाच्या प्रवाशाने रेल्वेच्या तिकीट तपासनीसावर (टीसी) गंभीर आरोप केले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली पाडल्याचा दावा मौर्य यांनी केला आहे.

मुंबई लोकलमध्ये हे काय घडलं? तिकीट नसल्याने टीसीने लाथ घातली, ट्रेनमधून ढकललं? तक्रार समोर येताच...
mumbai local trainImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2026 | 5:12 PM
Share

Mumbai Local Train : लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये अनेक घटना घडल्या. पश्चिम रेल्वेमध्ये तर वाद झाल्याने थेट खून झाल्याचा प्रकार अलिकडेच घडला. लोकलमध्ये मारहाणीचे प्रकारही समोर आले आहेत. दरम्यान आता एका अजब प्रकारामुळे पुन्हा एकदा मुंबईची लोकल राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका प्रवाशाने टीसीने प्रवाशाला लाथ मारून धावत्या रेल्वेतून बाहेर काढल्याचा दावा केला आहे. याबाबत प्रवाशाने तक्रारही केली आहे. या तक्रारीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रवाशाला लाथ मारून बाहेर काढल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशाचे नाव सचिन कुमार मौर्य असे आहे.

नेमकं काय घडलं

मुंबईतील सचिन कुमार मौर्य नावाच्या प्रवाशाने रेल्वेच्या तिकीट तपासनीसावर (टीसी) गंभीर आरोप केले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली पाडल्याचा दावा मौर्य यांनी केला आहे. सचिन कुमार मौर्य यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा प्रकार २५ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मस्जिद बंदर स्थानकाजवळ घडला. मौर्य यांनी सांगितले की, ते लोकलमधून उतरत असताना एका टीसीकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीची चौकशी सुरू होती. संबंधित प्रवाशाकडे दंड भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे समजल्यानंतर, टीसीने त्याला धावत्या गाडीतून लाथ मारून बाहेर ढकलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे तो प्रवासी थेट रेल्वे रुळांवर पडल्याचेही त्यांनी नमूद केले.

रेल्वे प्रशासनाने नेमकं काय सांगितलं?

या घटनेनंतर मी २५ जुलै रोजी सकाळी ९.२६ वाजता रेल्वे हेल्पलाइन १५१२ वर तक्रार नोंदवल्याचेही मौर्य यांनी सांगितले. या आरोपांवर रेल्वे प्रशासनाने मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. रेल्वेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, संबंधित टीसीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, संशयित विनातिकीट प्रवाशाने टीसीला पाहताच डब्याच्या विरुद्ध बाजूने स्वतःच उडी मारली होती. त्यानंतर टीसीही तातडीने खाली उतरला. रेल्वे प्रशासनानुसार भायखळा रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) सीसीटीव्ही फुटेजमध्ये टीसी डब्यात चढताना दिसत आहे. मात्र, प्रवाशाला मारहाण केल्याचा किंवा धक्का दिल्याचा कोणताही पुरावा त्यामध्ये आढळत नाही. तसेच, टीसी अवघ्या चार ते पाच सेकंदांत डब्यातून खाली उतरल्याचे फुटेजमध्ये दिसत असून, इतक्या कमी वेळात डब्यात प्रवेश करून प्रवाशाला लाथ मारणे आणि पुन्हा खाली उतरणे शक्य नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

Follow Us
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त