AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच बजेट 15 ते 16 कोटी, पण.. राऊत यांचा अत्यंत गंभीर आरोप

Sanjay Raut : "आपटे महाराष्ट्रातून पळून गेला असेल, सरकारने मदत केली असेल आणि पळून गेला नसेल तर लपण्यासाठी सुरक्षित जागा मंत्रालयाचा सहावा मजला किंवा वर्षा असेल. वर्षाशिवाय गुन्हेगारांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कुठली?" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच बजेट 15 ते 16 कोटी, पण.. राऊत यांचा अत्यंत गंभीर आरोप
संजय राऊतImage Credit source: ANI
| Updated on: Sep 04, 2024 | 9:06 AM
Share

“सरकारकडे इतर सर्व वायफळ कामांसाठी पैसे आहेत. पण शेतकरी जेव्हा मरणपंथाला लागतो, त्याचं आयुष्य वाहून जातं, तेव्हा शेतकरी आपला लाडका आहे असं या सरकारला कधीच वाटलेलं नाही. पाच-पंचवीस खोके शेतकऱ्याच्या पूनर्वसनासाठी, नुकसानभरपाईसाठी द्यावेत, ही या सरकारची मानसिकता नाही. मराठवाड्याच्या शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी युवा नेते आदित्य ठाकरे आणि मी स्वत: जात आहे. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्या दु:ख, अडचणी जाणून घेणार आहोत” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्र्यांच्या पक्षावर मोठी आपत्ती कोसळली आहे. मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्यानंतर त्यांच्या सरकारवर जी आपत्ती कोसळलेली आहे त्या आपत्तीतून सावरायला त्यांना वेळ नाही. तिथेच त्यांचं आपत्ती व्यवस्थापन फेल झालय. आदित्य ठाकरे यांनी मराठवाडा दौरा जाहीर करताच मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सरकारला जाग आली. त्यांनी पंचनाम्याचे, नुकसाभरपाईचे आदेश दिले. पण हे ढोंग आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

लपण्यासाठी सुरक्षित जागा मंत्रालयाचा सहावा मजला

“राज्याचा सगळा निधी विद्यार्थी, शेतकरी, सामाजिक न्याय विभागाचा सर्व निधी एकाच योजनेकडे वळवण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यावर आफत ओढवली आहे” असं संजय राऊत म्हणाले. जयदीप आपटेला अजून अटक झालेली नाही, त्या मुद्यावरही संजय राऊत बोलले. “जयदीप आपटे का सापडत नाही? आपटे सापडत नसतील, म्हणून लूक आऊट नोटीस जारी केली. राज्यामधलं सरकार काय करतय? आपटे महाराष्ट्रातून पळून गेला असेल, सरकारने मदत केली असेल आणि पळून गेला नसेल तर लपण्यासाठी सुरक्षित जागा मंत्रालयाचा सहावा मजला किंवा वर्षा असेल. वर्षाशिवाय गुन्हेगारांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कुठली?” असं संजय राऊत म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच बजेट 15 ते 16 कोटी, पण…

“माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी काही कोटींच बजेट होतं. 15 ते 16 कोटींच बजेट होतं. पण हा पुतळा 10 ते 15 लाखात बनवला” असा आरोप संजय राऊत यांनी केला. बदलापूरच्या घटनेबद्दलही ते बोलले. “बदलापूरच्या शाळेचे प्रमुख आपटे आहेत. एफआयआर आहे, पण अटक झालेली नाही. शाळेतून सीसीटीव्ही फुटेज कोणी गायब केलं? संस्थेच्या प्रमुखाने शिपायाला वाचण्यासाठी हे काम केलं की, अजून काही रहस्य आहेत?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

ममता बॅनर्जी सरकार विरोधात आंदोलन हे राजकारण

“पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार विरोधात आंदोलन हे राजकारण आहे. ज्यूनियर महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली. गुन्हेगाराला पकडलं, तपास सुरु आहे, अजून काय करायला पाहिजे होतं?” असं संजय राऊत म्हणाले.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.