Milind Deora : राजकीय घडामोड ! काँग्रेसचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा

या शिष्टमंडळात झिशान सिद्धिकी, रवी राजा, आमीन पटेल आणि काँग्रेसचे इतर नेते यांचा सहभाग होता. या भेटीत मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेची नवी वॉर्ड रचना रद्द करण्याची मागणी केल्याचे यावेळी मिलिंद देवरांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केले.

Milind Deora : राजकीय घडामोड ! काँग्रेसचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
काँग्रेसचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 3:07 PM

मुंबई : राज्यात सध्या मोठी राजकीय उलथापालथ घडली असतानाच आज काँग्रेसच्या शिष्टमंडळा (Congress Delegation)ने भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) काही महिन्यांवरच येऊन ठेपली असतानाच ही भेट घेतली गेल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या शिष्टमंडळात झिशान सिद्धिकी, रवी राजा, आमीन पटेल आणि काँग्रेसचे इतर नेते यांचा सहभाग होता. या भेटीत मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेची नवी वॉर्ड रचना रद्द करण्याची मागणी केल्याचे यावेळी मिलिंद देवरांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केले.

काय म्हणाले मिलिंद देवरा ?

सर्वांना माहित आहे, मुंबई महापालिका देशातील सर्वात प्रतिष्ठीत आणि सर्वात श्रीमंत महापालिका आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका निःपक्षपणे पार पडल्या पाहिजेत. कुठल्याही एका पक्षासाठी वॉर्डमध्ये फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे. म्हणून निःपक्ष निवडणुकांच्या हितासाठी आम्ही आज देवेंद्र फडणवीसजींना भेटलो. मुंबईच्या नवीन वॉर्डच्या सीमा रद्द कराव्यात, हीच आमची मागणी आहे. माझ्या नेतृत्वात काँग्रेसचे झिशान सिद्धिकी, रवी राजा, आमीन पटेल आणि काँग्रेसचे इतर शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. देशातील प्रतिष्ठीत अशा मुंबई महापालिकेची निवडणूक फ्री अँड फेअर व्हायला पाहिजे. कुणाच्या पक्षाच्या आधारावर भेदभाव झाला नाही पाहिजे. नवीन वॉर्डची रचना रद्द केली पाहिजे. 227 वॉर्डवर निवडणूक झाली पाहिजे.

मुंबई काँग्रेस पक्ष रवी राजा, भाई जगताप कोर्टात गेले आहेत. कोर्टात आणि राजकीय पातळीवरही आम्ही न्यायासाठी लढणार आहोत. हा फक्त काँग्रेस पक्षाचा विषय नाही, सामान्य मुंबईकरांचा पण विषय आहे. मुंबईकरांचा अधिकार आहे की निवडणुका प्रामाणिकपणे झाल्या पाहिजेत. या वॉर्ड रचनेतून कुणाचा फायदा आहे हे सर्वांना माहित आहे, कुणी मॅनिप्युलेट केलं होतं. मला या गोष्टीचं राजकारण करायचं नाही. माझा एकच उद्देश आहे की, सामान्य मुंबईकरांना फ्री अँड फेअर निवडणूक व्हायला पाहिजे. (Mumbai Congress delegation met Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.