5

जावयावर कारवाई केल्यानंच मलिकांनी वानखेडेंविरोधात मोर्चा वळवल्याचा आरोप, रामदास आठवलेंचा गंभीर आरोप

नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा वळवल्याचा गंभीर आरोप आठवले यांनी केलाय. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. ते मुस्लिम कधीच नव्हते, असंही आठवले म्हणाले.

जावयावर कारवाई केल्यानंच मलिकांनी वानखेडेंविरोधात मोर्चा वळवल्याचा आरोप, रामदास आठवलेंचा गंभीर आरोप
रामदास आठवले यांचा समीर वानखेडे कुटुंबाला जाहीर पाठिंबा
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 12:32 PM

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा जाहीर केलाय. समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज रामदास आठवले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी वानखेडे कुटुंबीय आणि आठवले यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यावेळी ज्ञानदेव वानखेडे यांनी आपल्याला त्यांचे सर्व कागदपत्र दाखवलाचं आठवले म्हणाले. तसंच पत्रकार परिषद घेत आठवले यांनी मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. (Ramdas Athavale alleges that Nawab Malik made vengeful allegations against Sameer Wankhede)

नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा वळवल्याचा गंभीर आरोप आठवले यांनी केलाय. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. ते मुस्लिम कधीच नव्हते. त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. ते उच्चशिक्षित आहेत. एक्साईज विभागात त्यांनी काम केलं आहे. त्यांनी सर्व कागदपत्र आम्हाला दाखवली आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबवावेत, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलंय.

क्रांती रेडकर ठामपणे पतीच्या पाठीशी

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिमच आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. त्याचबरोबर वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरीचेही आरोप करण्यात आले आहेत. अशावेळी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर ठामपणे आपल्या पतीच्या पाठीशी उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे. क्रांती रेडकर आणि त्यांचे सासरे ज्ञानदेव वानखेडे हे आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भेटीसाठी बांद्र्यातील निवासस्थानी दाखल झाले होते.

‘आठवलेंचा आशीर्वाद घेण्यासाठी भेट’

दरम्यान, आठवलेंसोबत झालेल्या भेटीपूर्वी क्रांती रेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांची साथ आम्हाला हवी आहे. आम्ही आज त्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. आमच्या अडचणी त्यांना सांगू. त्यांनी यापूर्वीही आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी अपेक्षा आहे, असं क्रांती रेडकर म्हणाले. त्यावेळी नवाब मलिक यांनी रात्री यास्मिन वानखेडे यांच्याबद्दल ट्विट केलं आहे, त्याबाबत काय म्हणणं आहे? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना आम्हाला त्यांच्यासाठी वेळ नाही, असं उत्तर क्रांती रेडकरने दिलं.

समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच – मलिक

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंबच मुस्लिम आहे. त्यांचे नातेवाईकही मुस्लिमच आहे, असं सांगतानाच बोगस दाखल्यावरूनच वानखेडे यांनी नोकरी मिळवली असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला. समीर वानखेडेंचा मेव्हणा आहे. तो आता व्हेनिसला राहतो. तो त्यांचा नातेवाईक आहे. तो मुस्लिम आहे. काल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मीडियाशी संवाद साधताना एक विधान केलं. वानखेडेंनी धर्मांतर केलं नाही असं ते म्हणाले. मी पुन्हा सांगतो वानखेडे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचे कुटुंब मुस्लिम होते, असं मलिक म्हणाले.

इतर बातम्या :

Photo : इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचा एल्गार; पुणे, डोंबविली, सोलापूरसह राज्यभरात सायकल रॅली

अभिनेत्री क्रांती रेडकर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या भेटीला, रामदास आठवलेंकडून पाठिंबा जाहीर

Ramdas Athavale alleges that Nawab Malik made vengeful allegations against Sameer Wankhede

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू