शरद पवारांवरील टीकेला जयंत पाटील यांचं उत्तर; नितेश राणेंपासून अजित पवारांपर्यंतचे ‘ते’ फोटो शेअर करत म्हणाले…

Jayant Patil on Nitesh Rane Tweet About Sharad Pawar : नितेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर शाब्दिक वार करताच जयंत पाटील मैदानात... हृषिकेश बेद्रे याचे 'ते' फोटो शेअर करत म्हणाले, आता याला काय म्हणायचं?. थेट अजित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...

शरद पवारांवरील टीकेला जयंत पाटील यांचं उत्तर; नितेश राणेंपासून अजित पवारांपर्यंतचे 'ते' फोटो शेअर करत म्हणाले...
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 10:03 AM

मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी काल एक फोटो शेअर केला. अंतरवली दगडफेकीतील आरोपी हृषिकेश बेद्रे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो शेअर करत नितेश राणे यांनी काही सवाल उपस्थित केले. जालन्यातील अंतरवली सराटी गावात झालेल्या दगडफेकीमागे नेमका कुणाचा हात आहे, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. त्यांच्या या ट्विटला आता राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हृषिकेश बेद्रे याचा नितेश राणे यांच्यासोबतचा फोटो जयंत पाटील यांनी शेअर केलाय. तसंच अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडित यांच्यासोबतचा हृषिकेश बेद्रे फोटो जयंत पाटील यांनी शेअर केलाय. आता याला काय म्हणायचं?, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

नितेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर केलेले आरोप जयंत पाटील यांनी फेटाळले आहेत. हे आरोप तथ्यहीन असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय हृषिकेश बेद्रे याचा नितेश राणे यांच्यासोबतचा फोटोही जयंत पाटील यांनी शेअर केलाय. आदरणीय पवार साहेबांच्या सोबतच्या एका कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल करुन साहेबांवर तथ्यहीन आरोप काही निवडक लोकांकडून केले जात आहेत. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला रोज हजारो लोक येत जात असतात. फोटो काढण्यावर कोणतेही बंधन ठेवता येत नाही, ही बाब महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच माहिती आहे. सोबत फोटो असल्याने जर कोणत्याही दगडफेकीला प्रोत्साहन दिले जात असेल तर या व्यक्तीचे इतरही अनेक स्थानिक नेत्यांच्या सोबत जवळकीचे फोटो आहेत. म्हणून त्यांनी या आरोपीला दगडफेक करण्यास प्रोत्साहन दिले, असे म्हणायचे का?, असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे.

नितेश राणे यांचं प्रत्युत्तर

जयंत पाटील यांनी पलटवार करताच नितेश राणे यांनी पुन्हा एक ट्विट केलं. यात त्यांनी हृषिकेश बेद्रेसोबतच्या फोटोचा खुलासा केला आहे. फोटो असेल पण दगडफेक झाल्यावर दुसऱ्याच दिवसाचा नाही… तिर सही निशाने पे लगा!!, असं नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे यांनी काल काय आरोप केले?

दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असं ट्विट नितेश राणे यांनी काल केलं. शिवाय त्यांनी हृषिकेश बेद्रे याचा शरद पवार यांचा फोटोही समोर आणला.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.