BMC Election 2022 kandar pada Ward 07 : शिवसेनेच्या शीतल म्हात्रे हॅट्रीक साधणार? मुंबईतील वॉर्ड क्रमांक 7च्या मतदारांची पुन्हा साथ मिळणार?

BMC Election 2022 kandar pada Ward 07 : 2017च्या महापालिका निवडणुकीत शीतल म्हात्रे या विजयी झाल्या. पण त्यांच्यासाठी हा विजय तसा सोपा नव्हता. त्यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली होती.

BMC Election 2022 kandar pada Ward 07 : शिवसेनेच्या शीतल म्हात्रे हॅट्रीक साधणार? मुंबईतील वॉर्ड क्रमांक 7च्या मतदारांची पुन्हा साथ मिळणार?
शिवसेनेच्या शीतल म्हात्रे हॅट्रीक साधणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 8:25 AM

मुंबई: शिवसेनेच्या (shivsena) आक्रमक आणि अभ्यासू नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे (sheetal mhatre) या तिसऱ्यांदा महापालिकेच्या रणमैदानात उतरणार आहेत. सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या शीतल म्हात्रे यांचा मतदारसंघ हा खुला झाला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी आहे. तिसऱ्यांदा विजयी होऊन शीतल म्हात्रे या विजयाची हॅट्रीक साधतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये शिवसेनेचं संघटन मजबूत आहे. शिवाय शीतल म्हात्रे यांनी या वॉर्डात प्रचंड कामं केली आहेत. वॉटर, मीटर, गटरपासून ते रस्ते आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांनी चांगलं काम केलं आहे. शिवाय त्या उक्तृष्ट वक्ता आहेत. महापालिकेतील (BMC) धडाडीच्या आणि कर्तबगार नगरसेविका आहेत. त्याचा परिणामही या निवडणुकीत होण्याची शक्यता आहेच. मात्र, त्यांच्यासमोर भाजप कोण उमेदवार देणार यावरही बरंच काही अवलंबून आहे. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाशीतल म्हात्रेशीतल म्हात्रे
भाजपयोगिता पाटील-
राष्ट्रवादी काँग्रेसतृप्ती येरूणकर-
काँग्रेसबॉबी वर्गिस -
मनसेपूजा भोईर-
अपक्ष / इतररमा चव्हाण-

विजय सोपा नव्हता

2017च्या महापालिका निवडणुकीत शीतल म्हात्रे या विजयी झाल्या. पण त्यांच्यासाठी हा विजय तसा सोपा नव्हता. त्यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली होती. भाजपच्या उमेदवार योगिता पाटील यांनी चांगलीच लढत दिली होती. त्यामुळे म्हात्रे यांचा अवघ्या 520 मतांनी विजय झाला होता. यावरून ही लढत किती अटीतटीची झाली होती हे दिसून येतं.

हे सुद्धा वाचा

एकही अपक्ष नाही

या निवडणुकीचं वैशिष्ट्ये म्हणजे या निवडणुकीत सहा उमेदवार उभे होते. सर्व सहाजण पक्षाचे उमेदवार होते. एकही अपक्ष उमेदवार उभा राहिला नव्हता. बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादीला चार अंकी आकडाही गाठता आला नव्हता.

लढलेले उमेदवार

  1. शीतल म्हात्रे (शिवसेना) – 8205
  2. योगिता पाटील (भाजप) – 7685
  3. पूजा भोईर (मनसे) – 2068
  4. बॉबी वर्गिस (काँग्रेस) – 1965
  5. रमा चव्हाण (बसपा) – 314
  6. तृप्ती येरूणकर (राष्ट्रवादी) – 271
  7. नोटा – 494

13,931 मतदार फिरकेलच नाही

या वॉर्डात एकूण 34,873 मतदार आहेत. त्यापैकी 20,942 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 13,931 मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेही नाहीत. या मतदारसंघाची लोकसंख्या 49731 एवढी आहे. या मतदारसंघात अनुसूचित जातीची संख्या 2647 इतकी असून अनुसूचित जमातीची संख्या 453 एवढी आहे.

असा आहे मतदारसंघ

वॉर्ड क्रमांक 7 मते दहिसर नदी, श्री दिगंबर जैन मंदिर, नवा गाव, कांदर पाडा, सुधीर फडके उड्डाणपूल, रामकुवर ठाकूर मार्ग, एस. व्ही. रोड, मराठा कॉलनी, सुकरवाडी, दौलत नगर आदी नगरांचा समावेश होतो.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.