AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022: Aarey Colony- Ward 53 – आरे कॉलनीतील सर्वसाधारण महिला आरक्षित मतदार संघात बाजी कोण मारणार

या निवणुकीत हा मतदार संघ सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्याने यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीतील महिलांना यावेळी आपले स्थान टिकवून ठेवण्यात यश येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .

BMC Election 2022: Aarey Colony- Ward 53 - आरे कॉलनीतील सर्वसाधारण महिला आरक्षित मतदार संघात बाजी कोण मारणार
Aarey Colony ward 53Image Credit source: Tv9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 19, 2022 | 12:47 AM
Share

मुंबई- मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे बिल वाजले आहे आरक्षणाची सोडत झाली असून वार्ड क्रमांक 53 आरे कॉलनी(Aarey Colony) म्हणून ओळखला जातो. 2017 च्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी हा मतदारसंघ राखीव होता. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना,भारिप बहुजन महासंघ, शिवसेना काँग्रेस, बीजेपी ,आरपीआय या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. यामध्ये शिवसेनेच्या (Shivsena)रेखाताई रामवंशी यांनी बाजी मारत ही निवडणूक जिंकली होती. त्यांना या निवडणुकीत 6088 मते मिळाली होती.  यंदा 2022 च्या निवडणुकीत नेमका कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवणुकीत हा मतदार संघ सर्वसाधारण महिला आरक्षित (Ordinary women reserved)झाल्याने यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीतील महिलांना यावेळी आपले स्थान टिकवून ठेवण्यात यश येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. मात्र यावेळी राज्यात बदललेल्या सत्तासमीकरणचा फायदा भाजप व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला होणार का? की बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेला भावनिकतेवर विजय ठरणार याकडे लक्ष आहे. राज्यात घडलेल्या राजकीय सत्तांतराचा परिणाम निश्चित निवडणुकीवर होणार आहे. शिवसेनेचे दोन गटातील विभाजनशिवसेनेच्या मत पेटीवर होतानादिसणार आहे. या निवडणुकीत मनसे कसे उतरणार हे पाहणे ही महत्त्वाचेआहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष / इतर

2017 चा निकाल काय सांगतो

दर्शना प्रकाश खंडागळे -अपक्ष- 1822 पुनम बबन खरात -महाराष्ट्र नवनिर्माण सेना -890 अलका भरत लांडगे-भरीत बहुजन महासंघ -990 रेखाताई दादासाहेब रामवंशी – शिवसेना -6088 पूजा अर्जुन सदाफुले -अपक्ष -105 रोहिणी संदीप सपकाळ -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -2358 संगीता विठ्ठल शिंदे -भारतीय जनता पार्टी -355 स्वाती साधू यादव- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- 213

मतदारांची संख्या किती

या निवडणुकीत एकूण 16,021 मतदारांनी मतदान केले होते. या मतदारसंघाचे एकूण लोकसंख्या 47 हजार 39 असून यामध्ये अनुसूचित जातीचे 5413 व अनुसूचित जमातीचे 2701 एवढे मतदार आहेत.

वार्ड कुठून कुठपर्यंत

आरे कॉलनी,  फिल्म सिटी,  रॉयल पल,  युनिट नंबर 22,  आरे डेरी,  महानंदा डेअरी,  एस आर पी एफ या परिसरांचा समावेश होतो.

Follow Us
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी