AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Sankalp Colony Ward 41 : अपक्ष असूनही सब पे भारी, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 41मध्ये तुळशीराम शिंदे चमत्कार घडवणार?

BMC Election 2022 Sankalp Colony Ward 41 : मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 18 उमेदवार उभे होते. त्यात सहा अपक्ष होते. एमआयएमचा आणि संभाजी ब्रिगेडचा उमेदवारही होता. मात्र या सर्वांना धोबीपछाड करत तुळशीराम शिंदे यांनी विजय मिळवला होता.

BMC Election 2022 Sankalp Colony Ward 41 : अपक्ष असूनही सब पे भारी, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 41मध्ये तुळशीराम शिंदे चमत्कार घडवणार?
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 41मध्ये तुळशीराम शिंदे चमत्कार घडवणार?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 08, 2022 | 8:16 AM
Share

मुंबई: 2017 मधील महापालिकेची (bmc)  निवडणूक अनेक कारणांमुळे गाजली. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच वर्षानंतर सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढत होते. अगदी शिवसेना (shivsena) आणि भाजपनेही (bjp) ही निवडणूक स्वबळावर लढवली. त्यामुळे कुणाची किती ताकद आहे हे दिसून आलंच. शिवाय या निवडणुकीत सर्वाधिक चांदी झाली ती अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची. आजवर युती आणि आघाडी करून लढणारेच पक्ष सातत्याने विजयी होत होते. अशावेळी सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळे लढल्याने अपक्षांचा फायदाच झाला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार तुळशीराम शिंदे यांनाही लॉटरी लागली. मतदारांनी सर्व प्रस्थापित पक्षांना मागे सारत शिंदे यांच्या पदरात मतदानाचं भरभरून दान केलं. त्यामुळे शिंदे निवडून आले. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला महापौरपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे अपक्षांच्या साथीने शिवसेनेने महापालिकेत महापौर बसवला होता.

 नेमकं काय घडलं?

मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 18 उमेदवार उभे होते. त्यात सहा अपक्ष होते. एमआयएमचा आणि संभाजी ब्रिगेडचा उमेदवारही होता. मात्र या सर्वांना धोबीपछाड करत तुळशीराम शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेच्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. तब्बल दोन हजाराच्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला होता.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनासदाशिव पाटील-
भाजपअर्चना देसाई-
काँग्रेसजयकांत शुक्ला -
राष्ट्रवादीअन्वर पीर सय्यद-
मनसेअजय सावंत-
अपक्ष / इतरतुळशीराम शिंदेतुळशीराम शिंदे

लोकसंख्या किती?

या मतदारसंघात 57 हजार 495 मतदार आहेत. या मतदारसंघात अनुसूचित जातीची संख्या 2 हजार 879 तर, अनुसूचित जमातीची संख्या 409 एवढी आहे. या मतदारसंघात मागच्यावेळी केवळ 18 हजार 791 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता.

लढले आणि जिंकले

  1. अर्चना देसाई (भाजप) – 2975
  2. सचिन घोलप (अपक्ष) – 131
  3. शामराव हिवाळे (भारिप)- 309
  4. दत्तात्रय कराडकर (संभाजी ब्रिगेड) – 34
  5. सचिन केळकर (अपक्ष) – 584
  6. रिजयान खान (बसपा) – 136
  7. रघुनाथ कोठारी (अपक्ष) – 746
  8. परेश मोरे (अपक्ष) – 58
  9. जुली पटेल (सपा) – 1055
  10. सदाशिव पाटील (शिवसेना) – 3869
  11. मंगेश पवार (बहुजन मुक्ती पार्टी) – 55
  12. अजय सावंत (मनसे) – 600
  13. अन्वर पीर सय्यद (राष्ट्रवादी) – 1858
  14. शेख अब्दुल वहाब फय्याज अली (एमआयएम) – 173
  15. नजीर शेखर (भारतवादी एकता पार्टी) – 23
  16. तुळशीराम शिंदे (अपक्ष) – 6217
  17. जयकांत शुक्ला (काँग्रेस) – 631
  18. यादव लालमणी (अपक्ष) – 83
  19. नोटा – 154

नागरी निवारा ते संकल्प कॉलनी

या मतदारसंघात नागरी निवारा, संतोष नगर, इंदिरा नगर डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट, संकल्प कॉलनी आणि नॅशनल पार्क परिसर आदी नगरे येतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.