AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022: Wakola ward 88 – वाकोला वार्डात शिवसेना आपला अस्तिस्त्व टिकवणार का?

वॉर्ड मध्ये 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे सदानंद परब यांनी 8424 मते घेत निवडणूक जिंकली होती.  आता येऊ घातलेल्या 2022 च्या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार माजी नगरसेवकांना (corporate )आपले अस्तित्व टिकवता येणार का हे पाहणी महत्वाचे ठरणार आहे.

BMC Election 2022: Wakola ward 88 - वाकोला वार्डात शिवसेना आपला अस्तिस्त्व टिकवणार का?
Wakola ward 88Image Credit source: Tv9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 18, 2022 | 11:57 PM
Share

मुंबई – महानगरपालिकेची आरक्षण सोडत काही दिवसांपूर्वी करण्यात आली. आता सर्वांना आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे (BMC Election)वेध लागलेले आहेत. निवडणूक लक्षात घेत राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विविध पक्ष कामाला लागले , असून राजकीय मोर्चा बांधलेला सुरुवात झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 88 हा वाकोला वॉर्ड (Wakola ward )म्हणून ओळखला जातो . या वॉर्ड मध्ये 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे सदानंद परब यांनी 8424 मते घेत निवडणूक जिंकली होती.  आता येऊ घातलेल्या 2022 च्या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार माजी नगरसेवकांना (corporate )आपले अस्तित्व टिकवता येणार का हे पाहणी महत्वाचे ठरणार आहे. राज्यातील सत्तेत झालेला बदल वाकोला वार्डात प्रभावी ठरणार का? इच्छुकांना उमेदवारी देण्यास राजकीय पक्ष धजवणार का? एवढंच नव्हे तर शिवसेनेला आपला आपला गड राखण्यात यश येणार का?

2022 च्या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार

2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. मात्र यावेळी राज्यात बदललेल्या सत्तासमीकरणचा फायदा भाजप व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला होणार का? की बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेला भावनिकतेवर विजय ठरणार याकडे लक्ष आहे. राज्यात घडलेल्या राजकीय सत्तांतराचा परिणाम निश्चित निवडणुकीवर होणार आहे. शिवसेनेचे दोन गटातील विभाजनशिवसेनेच्या मत पेटवर होताना दिसून आले आहे.

पक्ष उमेदवार उमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष / इतर

2017 चा निकाल काय सांगतो

हरचंद लीलाधर गुडका-नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -326 गुरव तानाजी -अपक्ष -78 मृणाल निलो टपाल -अपक्ष- 434 बाळाजी पडवळ -अपक्ष -315 पांडे आदित्य -अपक्ष-70 पंढरीकर विजय -अपक्ष -113 सदानंद परब शिवसेना- 8424 राजभर लालमनी -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 2012 डॉ सामंत प्रसाद -भारतीय जनता पार्टी-5534 सुभाष महादेव सावंत -अपक्ष -556 शिंदे सुहास -महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 3750 तिवारी अंजनी -अपक्ष -63

मतदार संख्या किती

या वरची लोकसंख्या 51,736 असून यामध्ये अनुसूचित जातीचे 869 व अनुसूचित जमातीचे 279 नागरिक आहेत 2017 च्या निवडणुकीत 21 हजार 990 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता यात 315 जणांनी नोटाचा वापर केला होता.

वार्ड कुठून कुठपर्यंत?

या मतदारसंघात आगरी पाडा वाकोला धावारी नगर प्रतीक्षा नगर शिवाजीनगर या परिसरांचा समावेश होतो.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा