AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushma Andhare : अंधारे बाई, याद राखा… यापुढे जर राज साहेबांच्या नातवाबद्दल काही बोललात तर…; मनसैनिकांचा इशारा

MNS Leader on Sushma Andhare Statement About Raj Thackeray : सुषमा अंधारे यांना मनसैनिकांचा इशारा म्हणाले, अंधारे बाई, या पुढे याद राखा... यापुढे जर राज साहेबांच्या नातवाबद्दल काही बोललात तर तर कानाजवळ डी. जे. वाजवू, असा इशारा देण्यात आला आहे. वाचा नेमकं काय घडलंय...

Sushma Andhare : अंधारे बाई, याद राखा... यापुढे जर राज साहेबांच्या नातवाबद्दल काही बोललात तर...; मनसैनिकांचा इशारा
| Updated on: Oct 07, 2023 | 4:09 PM
Share

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी, मुंबई |  07 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. यात त्यांनी राज ठाकरे यांचा नातू किआन याचाही उल्लेख केला. यावरून आता मनसैनिक आक्रमक झाले आहेत. अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राजसाहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात. तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही, असं ट्विट करत मनसेतच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना इशारा दिला आहे.

एका बड्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली. त्याचा आपल्या नातवाला त्रास झाला. म्हणून हा नेता भाष्य करेल. नेत्यांच्या नातवाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मात्र गोरगरिबांचं काय? नुसतं दुपारी उठून कसं चालेल, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. त्याला आता मनसेकडून उत्तर देण्यात आलं आहे. सुषमा अंधारे यांनी पब्लिसिटी कोण घेतोय. हे सगळ्यांनी बघितलं. राज साहेबांच्या नातूला राजकारणात संबंध नसताना आणण्याची काय गरज होती? हा माझा विषय होता, असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसं पत्रही शालिनी ठाकरे यांनी लिहिलं आहे.

शालिनी ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

प्रति,

सुषमा अंधारे

विषय – या पुढे संबंध नसताना राजसाहेब यांच्या नातवाला राजकारणात ओढाल, तर कानाजवळ डी. जे. वाजवू

प्रिय, अंधारे बाई,

हिंदू सण उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत यासाठी राजसाहेबांनी अनेकदा ठाम भूमिका घेतली आहे. मात्र काही हिंदू सणांमध्ये डी. जे. आणि लेझर लाईट मुळे होणारा त्रास याबाबत ही रोखठोक भूमिका घेवून त्यास विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेने तसेच सर्व पक्षातील संवेदनशील माणसांनी याचे स्वागत केले. हीच बाब बहुदा तुम्हाला रुचली नसल्याचे दिसतय.

सध्या मराठीबाबत तांडव सुरू असताना तुमचे शिल्लक सेना प्रमुख आणि त्यांचे बगल बच्चे शांतच आहेत. अशा वेळी फक्त मनसे आणि राजसाहेब सडेतोड भूमिका घेताना दिसत आहेत. म्हणुनच राजसाहेबांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न कर आहात.

कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या ‘गट’ प्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी तुमच्या ‘गट’ प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या

नातवाला राजकारणात ओढले होते. मग तुमच्या सारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते.

शिल्लक सेना प्रमुख आज काल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत, म्हणुन आपण नैराश्येत आहात. त्यातूनच संबंध नसताना आपण राजसाहेबांच्या नातवाला या राजकारणात ओढले. हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. या बाबत आपण खरंतर जाहीर माफी मागितली पाहिजे. पण आमच्या देव देवतांचा, आमच्या संतांचा अपमान करणाऱ्या तुम्ही. त्यामुळे आम्ही आपल्याकडून ही सुसंस्कृत अपेक्षा करणेच चूक आहे.

आपल्याला ही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी विधाने केली, तर ती तुमच्या मनाला रुचतील का ?

अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही.

ज्या बाबी पटत नसतील त्याला विरोध जरूर करा. मात्र विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा.

आपली नम्र

शालिनी ठाकरे

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यावरही शालिनी ठाकरे यांनी भाष्य केलं. मला उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे येत आहे. याबाबत आमची काहीही चर्चा राज साहेबांसोबत झालेली नाही. उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीसाठ उत्सुक आहे. त्यामुळे त्यानेही इच्छा व्यक्त केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.