हिंदूमध्ये फूट पाडणाऱ्या कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात याचा विचार करण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यपाल हे राष्ट्रपतीचे दूत असतात. जातपात धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना समान वागणूक देणं हे त्याचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य मोडलं असेल तर त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा. दुसरा गुन्हा म्हणजे त्यांनी हिंदूत फूट पाडण्याचं काम केलं आहे.

हिंदूमध्ये फूट पाडणाऱ्या कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात याचा विचार करण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 30, 2022 | 1:51 PM

मुंबई : राज्यामध्ये शिवसेनाविरूध्द राज्यपाल (Governor) हा संघर्ष काही नवा नाहीयं. नेहमीच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे राज्यपालांसोबत खटके उडतात. काल एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून (Mumbai) गुजराती आणि राजस्थानी लोकांचा पैसा काढून घेतला तर मुंबई ही आर्थिक राजधानीच राहणार नाही, असे मोठे आणि धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभरातून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिका होतयं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेतून राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टिका केलीयं.

उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर केली सडकून टिका

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यपाल हे राष्ट्रपतीचे दूत असतात. जातपात धर्माच्या पलिकडे जाऊन सर्वांना समान वागणूक देणं हे त्याचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य मोडलं असेल तर त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा. दुसरा गुन्हा म्हणजे त्यांनी हिंदूत फूट पाडण्याचं काम केलं आहे. राज्यपालांनी फूट पाडण्याचं काम केलं आहे. हा त्यांचा अधिकार आहे का? ज्या राज्यात जाता तिथे सुखाने नादणाऱ्या लोकांमध्ये फूट पाडून वातावरण खराब करतात. आता कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टिका केली जातंय.

हे सुद्धा वाचा

घरी पाठवायचं की तुरुंगात याचा विचार करण्याची वेळ आलीय

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत, ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालाविषयी भूमिका घेतली पाहिजे. हे पार्सल कुठेतरी पाठवलं आहे. ते पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल महाराष्ट्रात राहुन जाती पाती आणि धर्मात आगी लावत असेल, मराठी माणसाचा अपमान करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हा करायला हवे. घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं हा निर्णय त्या स्तरावर घेतला जावा ही हिंदूंच्यावतीने मागणी आहे, असेही ठाकरे म्हणाले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें