अजित पवारांच्या अपघात/घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? 16 नोव्हेंबरला फुटणार मोठा बॉम्ब
अजितदादांच्या अपघातामागे घातपात असल्याच्या चर्चांना आता नव्या पोस्टरमुळे वेगळं वळण मिळालं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टरवर एका नेत्याला थेट सवाल करण्यात आला आहे.

अजितदादांच्या अपघातामागील घातपाताच्या चर्चांना नवे वळण, मिळाले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेरील रहस्यमय पोस्टरने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पोस्टरवर “अजितदादांच्या अपघात / घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?” असा थेट सवाल या पोस्टरमध्ये विचारण्यात आला आहे. या पोस्टरवर मफलरची प्रतिकृती पाहायला मिळत आहे, मात्र कोणत्याही नावाचा उल्लेख नाही करण्यात आलेला नाही. त्यामुळे १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नेमकं काय घडणार, या दिवशी कोणता राजकीय बॉम्ब फुटणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीला वाचवणारा नेता कोण, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मफलरवाल्या नेत्याचा उल्लेख केला होता. हा नेता छगन भुजबळ किंवा अरविंद केजरीवाल नसून दुसराच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच, येत्या 10 ऑक्टोबर रोजी या नेत्याचे नाव जाहीर करून पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर झळकलेल्या पोस्टरमागे रोहित पवार यांचीच भूमिका असल्याचा तर्क लावला जात आहे.
मात्र, हे पोस्टर रोहित पवार यांच्या माध्यमातून लावण्यात आल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या पोस्टरमागे नेमकं कोण आहे, याबाबतचं गूढ कायम आहे.
बातमी अपडेट होत आहे…