Nagar Panchayat Election Result 2022 : नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी, पण क्रमांक एकचा भाजपचा दावा! पाहा संपूर्ण निकाल

Nagar Panchayat Election Result 2022 : नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी, पण क्रमांक एकचा भाजपचा दावा! पाहा संपूर्ण निकाल
नगर पंचायत निवडणूक निकाल

या निवडणुकीत भाजपाच क्रमांक एकचा पक्ष राहिल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी केलाय. तर एकूण 106 पैकी 97 नगर पंचायतीचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी सर्वाधिक 27 नगर पंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलंय. 22 नगर पंचायतींसह भाजप दुसऱ्या, 21 नगर पंचायतींसह काँग्रेस तिसऱ्या तर 17 नगर पंचायतींसह शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 20, 2022 | 12:02 AM

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचीच (Mahavikas Aghadi) सरशी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, नगर पंचायतीच्या सर्वाधिक जागा भाजपच्या पारड्यात गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाच क्रमांक एकचा पक्ष राहिल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी केलाय. तर एकूण 106 पैकी 97 नगर पंचायतीचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी सर्वाधिक 27 नगर पंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलंय. 22 नगर पंचायतींसह भाजप दुसऱ्या, 21 नगर पंचायतींसह काँग्रेस तिसऱ्या तर 17 नगर पंचायतींसह शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे.

कोणत्या पक्षाचं किती नगर पंचायतीवर वर्चस्व?

>> राष्ट्रवादी काँग्रेस – 27
>> भाजप – 22
>> काँग्रेस – 21
>> शिवसेना – 17
>> अन्य – 10

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणूक निकाल

नगर पंचायतीसह भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा निकालही आज लागला. त्यात भंडारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोणत्याही एका पक्षाला इथं बहुमत मिळू शकलं नाही. दुसरीकडे गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप बहुमतापासून अवघी एक जागा दूर आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्याचं स्पष्ट झालंय.

ZP Result Graph

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निकाल

भंडाऱ्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

  • काँग्रेस – 22
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 13
  • भाजप – 12
  • शिवसेना – 00
  • अन्य – 05

गोंदियात कोणत्या पक्षाला किती जागा?

  • भाजप – 26
  • काँग्रेस – 13
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 8
  • शिवसेना – 00
  • अन्य – 06

पंचायत समिती निवडणूक निकाल (गोंदिया- 8 पंचायत समिती)

Panchayat Samiti Graph

भंडारा गोंदिया पंचायत समिती निकाल

1. गोंदिया पंचायत समिती : 28 जागा

>> भाजप – 10
>> राष्ट्रवादी – 05
>> काँग्रेस – 00
>> सेना –
>> चाबी संघठन – 10
>> अपक्ष – 3

2. तिरोडा पंचायत समिती : 14 जागा

>> भाजप – 09
>> राष्ट्रवादी – 03
>> काँग्रेस – 01
>> सेना – 00
>> अपक्ष -01

3. गोरेगाव पंचायत समिती : 12 जागा

>> भाजप – 10
>> राष्ट्रवादी – 00
>> काँग्रेस – 02
>> सेना – 00
>> अपक्ष – 00

4. देवरी पंचायत समिती : 10 जागा

>> भाजप – 06
>> राष्ट्रवादी – 00
>> काँग्रेस -04
>> सेना – 00
>> अपक्ष – 00

5. आमगाव पंचायत समिती : 10 जागा

>> भाजप – 05
>> राष्ट्रवादी -01
>> काँग्रेस -04
>> सेना – 0
>> अपक्ष – 0

6. सालेकसा पंचायत समिती : 08 जागा

>> भाजप – 02
>> राष्ट्रवादी – 00
>> काँग्रेस – 06
>> सेना – 00
>> अपक्ष – 00

7. मोरगाव अर्जुनी पंचायत समिती : 14 जागा

>> भाजप – 06
>> राष्ट्रवादी -02
>> काँग्रेस – 04
>> सेना – 00
>> अपक्ष – 02

8. सडक अर्जुनी पंचायत समिती : 10 जागा

>> भाजप – 07
>> राष्ट्रवादी – 02
>> काँग्रेस – 01
>> सेना – 00
>> अपक्ष – 00

पंचायत समिती निवडणूक निकाल (भंडारा- ७ पंचायत समिती)

1. भंडारा पंचायत समिती : 20 जागा

>> राष्ट्रवादी – 06
>> भाजपा – 07
>> काँग्रेस – 04
>> शिवसेना – 01
>> अपक्ष – 02

2. तुमसर पंचायत समिती : 20 जागा

>> भाजपा – 10
>> राष्ट्रवादी – 6
>> काँग्रेस – 3
>> शिवसेना – 1

3. लाखांदूर पंचायत समिती

>> भाजपा – 9
>> काँग्रेस – 6
>> अपक्ष – 2

4. मोहाडी पंचायत समिती

>> भाजप – 8
>> राष्ट्रवादी – 6

5. लाखनी पंचायत समिती

>> काँग्रेस – 6
>> भाजप – 1
>> अपक्ष – 1

6. साकोली पंचायत समिती

>> काँग्रेस – 9
>> अपक्ष – 3

7. पवनी पंचायत समिती

>> काँग्रेस – 6
>> राष्ट्रवादी – 3
>> भाजप – 1
>> शिवसेना – 3
>> बीएसपी – 1

इतर बातम्या :

Nagar Panchayat Election Result : मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, फडणवीसांचा शिवसेनेला जोरदार टोला

Nagar Panchayat Election Result : गोपीचंद पडळकरांच्या खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें