शिवसेना-भाजप निवडणुका एकत्र लढणार का?; बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांबाबत असं बोलत असतील तर…

Bacchu Kadu on Loksabha Election 2024 : अनिल बोंडे यांनी लायकी पाहून बोलावं; 'त्या' जाहिरातीवरून वाद, बच्चू कडू यांचा थेट इशारा

शिवसेना-भाजप निवडणुका एकत्र लढणार का?; बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांबाबत असं बोलत असतील तर...
| Updated on: Jun 15, 2023 | 10:55 AM

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीवरून प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. आज पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी अनिल बोंडे यांना इशारा दिला आहे. तर आगामी निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलंय.

आगामी निवडणुका सोबत लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा 2024 ची निवडणूकसोबत लढलीच पाहिजे. पण हे असं जर एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलत असतील. आम्ही युतीत असून ते मुख्यमंत्र्यांना असं बोललं जात असेल. त्यांच्या प्रसिद्धीवर बोललं जात असेल तर मग लोक असं म्हणतात की भाजप वेगवेगळ्या पक्षांनासोबत घेऊन आपल्याच साथीदारांना कमी करण्याचा तर प्रयत्न करत नाही? मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होत असेल. तर लोक फार विचार करून सोबत जातील, असं बच्चू कडू म्हणालेत.

अनिल बोंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत वक्तव्य करतात. त्यांनी लायकी पाहून तरी किमान बोललं पाहिजे. कुणामुळे आपण कुठे आहोत हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बेडूक वगैरे असलं अक्कल नसल्यासारखं बोलू नये. त्यांना केंद्रात काही अडचणी येत असतील त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांबाबत असं बोलत आहेत, असं बच्चू कडू म्हणालेत.

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, असं उदाहरण देत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना त्यांच्या आजूबाजूचे चुकीचे सल्ले देत आहे. शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलं आहे, असं अनिल बोंडे म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजासाठी काम करतात. ते एक भाजपमधील नेते आहेत. त्यांचं नाव खेड्यापाड्यासह इतर ठिकाणी निघत असतं. त्यामुळे हा सर्व्हे नेमका केला कोणी? तो ठाण्यापुरतं मर्यादित होता का? की महाराष्ट्राचा होता? असा सवाल करतानाच पुढच्या काळात शिवसेनेला वाटचाल करायची असेल तर भाजप आणि जनतेच मन दुखून स्वतःला पुढे करून चालणार नाही. टिमकी वाजून सल्ले देणारे असतील तर त्यांचं कल्याण होणार नाही, असा टोलाही अनिल बोंडे यांनी लगावला आहे.