AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole : मध्यावधी होतील पण शिवसेनेचा कार्यक्रम झाल्यावरच..! पटोले यांनीच सांगितली भाजपाची रणनिती

सध्याच्या राजकीय घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाला मान्यता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाची जी रणनिती आहे त्यामधून तर शिवसेना संपवायची ही भाजपाची रणनिती आहे. त्यामुळे शिवसेना चिन्ह राहील की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. बिहारमध्ये असा प्रयोग भाजपाने केला आहे. तोच प्रयोग आता महाराष्ट्रात करतील असे चित्र आहे.

Nana Patole : मध्यावधी होतील पण शिवसेनेचा कार्यक्रम झाल्यावरच..! पटोले यांनीच सांगितली भाजपाची रणनिती
कॉंग्रेस नेते नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 04, 2022 | 11:15 AM
Share

मुंबई :  (BJP) भाजपा आणि शिंदे गटाच्या माध्यमातून सरकारची स्थापना होताच आता मध्यावधी निवडणुका लागतील असा सूर (MVA) महाविकास आघाडी सरकारमधून निघत आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी याबाबत विधान केले असले तरी कॉंग्रेसचे (Nana Patole) नाना पटोले यांनी मात्र, भाजपाची रणनिती आणि शिवसेनेची होत असलेली स्थिती सांगून मध्यावधीबाबत विधान केले आहे. भाजपाने केवळ या सरकार स्थापनेचा विचार करुनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवले असे नाहीतर यामागे मोठे नियोजन असल्याचे पटोले म्हणाले. शिवाय ज्या पध्दतीने सध्या भाजपाची रणनिती आहे त्यानुसार तर शिवसेनेचा कार्यक्रमच होईल अशी स्थिती आहे. भाजपाला शिवसेनेचे अस्तित्वच संपवायचे आहे असेच सध्याचे चित्र असून त्यानंतरच राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा अंदाज कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. त्यामळे मध्यावधी निवडणुकांना घेऊन कॉंग्रेसनेही यामध्ये आपला सूर आवळला आहे.

शिवसेना संपवायची हाच भाजपाचा ‘प्लॅन’

सध्याच्या राजकीय घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाला मान्यता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाची जी रणनिती आहे त्यामधून तर शिवसेना संपवायची ही भाजपाची रणनिती आहे. त्यामुळे शिवसेना चिन्ह राहील की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. बिहारमध्ये असा प्रयोग भाजपाने केला आहे. तोच प्रयोग आता महाराष्ट्रात करतील असे चित्र आहे. ही सर्व प्रक्रिया आणि शिवसेनेचा कार्यक्रम करायला आणखी 5 ते 6 महिने लागतील आणि त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा अंदाज नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

बहुमत सिध्द करणे ही केवळ औपचारिकता पण…

विधानसभा अध्यक्ष निवडीच्या दरम्यान सर्वकाही स्पष्ट झाले आहे. शिवाय एकनाथ शिंदे याच्या गटाला आता मान्यताही देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपाचे बहुमत सिध्द होणार यामध्ये आता काही नवीन राहिले नाही. बहुमत तर सिध्द होणार आता केवळ औपचारिकता राहिले असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. पण त्यानंतर सरकारची खरी परीक्षा असणार आहे. राज्यातील परस्थिती पावसाने दिलेली ओढ, शेतकऱ्यांवरील संकट याचा निपटारा करताना सरकारचे कसब पणाला लागणार असल्याचे पटोले म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सरकारला पत्र

विधानसभेत बहुमत सिध्द होईल मात्र, त्यानंतर सरकारची खरी परिक्षा सुरु होणार आहे. कारण राज्यात जुलै महिना उजाडला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी होऊनही खरीप संकटात आहे. शिवाय अनेक जिल्ह्यामध्ये खत, बियाणांचा तुटवडा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पेरणी करुनही नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करुन मदत मिळावी व खत, बियाणांचा पुरवठा केला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार