या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय काय? – नारायण राणे

| Updated on: Feb 16, 2021 | 5:09 PM

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना ठाकरे सरकार पाठबळ देत असल्याचा घणाघात राणे यांनी केलाय.

या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय काय? - नारायण राणे
नारायण राणे, भाजप नेते
Follow us on

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना ठाकरे सरकार पाठबळ देत असल्याचा घणाघात राणे यांनी केलाय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त होतं. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. त्यावरुन राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.(Narayan Rane criticizes Thackeray government over Pooja Chavan suicide case)

ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ, ताकद देत आहे. इथं कुंपणच शेत खात आहे. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियान आणि आता पूजा चव्हाण प्रकरणात तेच होत आहे. एखात्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर बलात्कार, हत्या सारखे गंभीर आरोप झाले. पण ठाकरे सरकारकडून सगळ्यांना अभय देण्याचं काम सुरु असल्याची टीकाही राणेंनी केलीय. त्याचबरोबर या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय काय? असा सवालही राणेंनी विचारला आहे.

नवाब मलिकांना जोरदार टोला

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार नारायण राणे हे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. राज्यात स्वप्न पाहणारी मंडळी वाढत चालली आहेत. गेल्या 22 वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता जोडीदार म्हणून देवेंद्र फडणवीस भेटलेत, असं नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिकांच्या या टीकेचा नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतलाय. देवेंद्र फडणवीस आणी मी दोघेही मुख्यमंत्री राहिलो आहोत. नवाब मलिक त्या स्पर्धेत कुठेच नाहीत. त्यामुळे त्यांनी उगाच मोठी स्वप्न पाहू नयेत, असा टोला राणे यांनी मलिकांना लगावला आहे.

शिवजयंती उत्सावावरुन सरकारवर टीका

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती उत्सवासाठी नियमावली आखून दिली आहे. त्यावरुन राज्य सरकारवर मराठा संघटनांसह अनेक नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेते नारायण राणे यांनीही या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. गंभीर आरोप असलेले संजय राठोड, आदित्य ठाकरे यांच्या समर्थनाच्या मोर्चासाठी परवानगी मिळते. मग शिवजयंतीला नियमावली का? असा सवाल राणे यांनी सरकारवा विचारला आहे.

संबंधित बातम्या :

Pooja Chavhan case | “संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, ‘ते’ वृत्त चुकीचे” : संजय राऊत

‘देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील’

Narayan Rane criticizes Thackeray government over Pooja Chavan suicide case