‘देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील’

शिवसेनेशी फारकत घेतल्यापासून भाजपची अवस्था काय आहे, हे सगळ्यांनाच चांगले माहिती आहे. | Nawab Malik

'देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील'
गेल्या 22 वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता जोडीदार म्हणून देवेंद्र फडणवीस भेटलेत,
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 3:01 PM

परभणी: देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत असल्याची खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली. राज्यात स्वप्न पाहणारी मंडळी वाढत चालली आहेत. गेल्या 22 वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता जोडीदार म्हणून देवेंद्र फडणवीस भेटलेत, असे नवाब मलिक यांनी म्हटले. (NCP leader Nawab Malik slams Narayan Rane and Devendra Fadnavis)

ते मंगळवारी परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपला चिमटे काढले. शिवसेनेशी फारकत घेतल्यापासून भाजपची अवस्था काय आहे, हे सगळ्यांनाच चांगले माहिती आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस वारंवार आम्ही भविष्यात फासे फिरवू, अशी भाषा करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी ज्योतिष विद्या कुठून शिकली, हे आम्हाला माहिती नाही. पण आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नसल्याचे नवाव मलिक यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीवरही नवाब मलिक यांना टीकास्त्र सोडले होते. भाजपचे नेते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतात. या भेटीनंतर ते वादग्रस्त वक्तव्य करुन महाविकासआघाडीचे राज्यातील सरकार पाडण्यासाठी वातावरणनिर्मिती करु पाहत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

शिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतंय; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचे वक्तव्य

फडणवीस-राऊत गळाभेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी आणखी एक घटना समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Manguntiwar) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर हे दोन्ही नेते भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच काळ चर्चा झाल्याचे सांगितले जाते. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (BJP leader Sudhir Manguntiwar meets CM Uddhav Thackeray)

विशेष म्हणजे या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचक वक्तव्याने या संभ्रमात आणखीनच भर टाकली. आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की शिजतंय तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.दरम्यान, या भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

‘आता पुढे बघू काय होतंय’

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत. कधीकाळी युतीमध्ये सडलो, म्हणत युती तोडली, पण नंतर परत सोबत आले, आता पुढे बघू, असं मुनगंटीवार म्हणाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.

संबंधित बातम्या:

शिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतंय; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचे वक्तव्य

भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान

मुनगंटीवार स्वत:साठी शिवसेनेकडे फिल्डींग लावतायत? फडणवीसांची भूमिका काय?

(NCP leader Nawab Malik slams Narayan Rane and Devendra Fadnavis)

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.