जशास तसं ! ईडीनं मविआ नेत्यांना तासनतास बसवलं आता मुंबई पोलीसांनी राणेंना, 5 तासापासून चौकशी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची गेल्या तब्बल पाच तासापासून चौकशी सुरू आहे. राणेंचा अटकपूर्व जामीन मजूर झाला असला तरी दिशा सॅलियनच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू आहे.

जशास तसं ! ईडीनं मविआ नेत्यांना तासनतास बसवलं आता मुंबई पोलीसांनी राणेंना, 5 तासापासून चौकशी
दिशा सॅलियनबाबतच्या आरोपांमुळे राणेंची चौकशीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:35 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची गेल्या तब्बल पाच तासापासून चौकशी सुरू आहे. राणेंचा अटकपूर्व जामीन मजूर झाला असला तरी दिशा सॅलियनच्या (Disha Salian case) पालकांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांना ईडी तासनतास बसवत आहे. तर दुसरीकडे राणेंनाही पोलिसांनी तासंतास बसवलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. दिशा सॅलियनचा बलात्कार करून हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप राणेंनी केला होता. त्यानंतर बदनामी केल्याची तक्रार दिशाच्या पालकांनी राणेंविरोधात केली आहे. याच प्रकरणात मालवणी पोलिसांत राणेंची चौकशी सुरू आहे. नितेश राणे यांच्याविरोधातही ही तक्रार झाली आहे. नितेश राणे आणि मुंबईच्या महापौर यांच्यात यावरून वादही झाला आहे.

बाजू मांडण्यासाठी राणे पोलीस स्टेशनमध्ये

दरम्यान या प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला एफआयर दाखल झाला होता. त्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना दिंडोशी न्यायालयानं शुक्रवारी राणे पिता -पुत्राला दिलासा दिला. 10 मार्चपर्यंत नारायण राणे किंवा नितेश राणे यांना अटक करू नये असे आदेश न्यायलयाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान आता या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी नारायण राणे मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.

राणेंचे गंभीर आरोप

दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि दिशा सॅलियन प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. मात्र सुशांत सिंह राजपूत केसमध्ये सीबीआय चौकशीनंतरही काही बाहेर आलं नाही. दिशाच्या प्रकरणातही राणेंच्या आरोपांमुळे ट्विस्ट आले आहे.

रवी राणांची जेलवारी टळली, आता मनपा आणि पोलीस आयुक्तांवर कारवाईसाठी आक्रमक

‘लढायचं ते जिंकण्यासाठीच’, महापालिका जिंकण्यासाठी मनसेचा नवा नारा; पोस्टरवर पहिल्यांदाच अमित ठाकरे!

Breaking : एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोपीचंद पडळकर पुन्हा मैदानात, आझाद मैदानात पुकारला एल्गार

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....