AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवी राणांची जेलवारी टळली, आता मनपा आणि पोलीस आयुक्तांवर कारवाईसाठी आक्रमक

आष्टेकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणात रवी राणा यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं रवी राणा यांनी स्पष्ट केलंय.

रवी राणांची जेलवारी टळली, आता मनपा आणि पोलीस आयुक्तांवर कारवाईसाठी आक्रमक
अमरावती मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांवर कारवाईची रवी राणांची मागणीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 7:08 PM
Share

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा बसवण्यावरुन निर्माण झालेला वाद आणि महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Pravin Ashtikar) यांच्यावरील शाईफेक प्रकरणामुळे आमदार रवी राणा (Ravi Rana) वादात सापडले आहेत. आष्टेकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणात रवी राणा यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं रवी राणा यांनी स्पष्ट केलंय.

न्ययालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर रवी राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केलेत. पोलीस आयुक्तांनी दबावाखाली येऊन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप राणा यांनी केलाय. शाईफेकीच्या घटनेवेळी मी दिल्लीत होतो. असं असतानाही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मी आता अमरावती पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. तसंच सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार असल्याचं राणा यावेळी म्हणाले.

आष्टीकर यांची अमरावतीत पैसे देऊन पोस्टिंग, रवी राणांचा आरोप

आयुक्तांवरील शाईफेकीचं आपण समर्थन करत नसल्याचं आमदार रवी राणा यांनी यापूर्वी म्हटलं होतं. मात्र शिवप्रेमी आक्रमक झाले, त्यांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं. आष्टीकर यांनी पैसे देऊन अमरावतीत पोस्टिंग घेतली आणि त्यांनी दोन महिन्यांत 4 ते 5 कोटी रुपये 3 टक्के कमिशन घेत कंत्राटदारांकडून कमावल्याचा गंभीर आरोपही रवी राणा यांनी केलाय. इतकंच नाही तर मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी चमचेगिरी करु नये असा उपरोधिक सल्लाही राणांनी दिला होता.

अमरावतीतील शाईफेक प्रकरण

पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिकेच्या आवारात 9 फेब्रुवारी रोजी दुपारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकासोबत कचऱ्याची पाहणी करत होते, त्यावेळी हा प्रकार घडला. ओपन स्पेस असल्याने या ठिकाणी दोन महिला आल्या. त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका महिलेने आपल्या पिशवीतून एक बॉटल काढली. त्यात काही तरी असल्याचं लक्षात आल्याने आष्टीकर सतर्क झाले अन् त्यांनी पळायला सुरुवात केली.

आयुक्त एका रिक्षाच्या मागे जात असतानाच एका महिलेने त्यांना घेरले अन् बिसलेरीची बाटली भरून आणलेली शाई आयुक्तांच्या अंगावर ओतली. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने तेवढ्यात धाव घेऊन आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या सुरक्षा रक्षकाने आयुक्तांना लहान लेकरासारखं कवटाळून धरत या महिलांपासून त्यांचा बचाव केला. त्यानंतर या महिला धावतच पळून गेल्या. जाताना या महिलांनी जय भवानी, जय शिवाजीचे नारे दिले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.

इतर बातम्या :

Video : शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींना जोरदार टोला, तर फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर

रवी राणा यांची जेलवारी टळली, आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.