मोदींचा शपथविधी सोहळा, तारीख, वेळ ठिकाण ठरलं!

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 542 पैकी 352 जागांवर दणदणीत विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथ विधी सोहळ्याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. मोदी 30 मे रोजी गुरुवारी सायंकाळी 7 वाजता पंतप्रधानपदाची शपथ …

मोदींचा शपथविधी सोहळा, तारीख, वेळ ठिकाण ठरलं!

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 542 पैकी 352 जागांवर दणदणीत विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथ विधी सोहळ्याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. मोदी 30 मे रोजी गुरुवारी सायंकाळी 7 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यावेळी मोदींसोबत नव्या मंत्रीमंडळातील काही नवे मंत्रीही त्यांच्या मंत्रीपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती भवनाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (24 मे) कॅबिनेटच्या बैठकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा देत सध्याची लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली होती. कॅबिनेटची मंजुरी आणि पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींकडून यावर कार्यवाही केली जाते.

16 व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपत आहे. त्यामुळे 3 जूनपूर्वी 17 व्या लोकसभेची नियुक्ती होईल. 3 निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना भेटून नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी देतील आणि संसदेच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु होईल. या सर्व प्रक्रियेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंतप्रधानांना शपथ देतील. पंतप्रधानांच्या शिफारशीने राष्ट्रपतींकडून मंत्र्यांची निवड होईल आणि त्यानंतर त्यांचाही शपथविधी सोहळा होईल.

नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार?

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यंदा काही मंत्र्यांना नव्या जबाबदारीसह पुन्हा संधी दिली जाईल, तर काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मोदींच्या मंत्रिमंडळातील 2 खात्यांकडे सध्या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ते म्हणजे अर्थमंत्रालय आणि गृहमंत्रालय. सध्या गृहमंत्रीपदासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं नाव चर्चेत आहे, तर अर्थमंत्रालयासाठी पियुष गोयल चर्चेत आहेत.

मोदींचे संभाव्य मंत्रिमंडळ

  • स्मृती इराणी
  • रवी शंकर प्रसाद
  • नितीन गडकरी
  • मुख्तार अब्बास नक्वी
  • धर्मेंद्र प्रधान
  • प्रकाश जावडेकर
  • जगत प्रकाश नड्डा

यांना मिळणार डच्चू

  • हरदीप पुरी
  • के.जे.अल्फोन्सो
  • मनोज सिन्हा

मित्रपक्षांना काय?

भाजपला शतप्रतिशत बहुमत मिळालं आहे त्यामुळे त्यांना घटकपक्षांची तशी गरज नाही. मात्र तरीही काही मंत्रीपदं घटकपक्षांनाही दिली जातील. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी चांगली कामगिरी केली. या पक्षातून एक-दोन मंत्री नव्या कॅबिनेटमध्ये दिसून येतील. रामविलास पासवान यांचा एलजेपी, शिवसेना आणि अकाली दलालाही नव्या कॅबिनेटमध्ये स्थान असेल.

भाजपप्रणित एनडीएने लोकसभा निवडणुकांमध्ये 542 पैकी 352 जागा जिंकत स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त जागा मिळवल्या आहेत. यामध्ये एकट्या भाजपनेच 300 चा आकडा पार केलाय. 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवण्याचा विक्रम मोदींनी केला आहे. गेल्या निवडणुकीत मोदींनी 26 मे रोजी शपथ घेतली होती. अतिशय नेत्रदीपक सोहळ्यात हा शपथविधी पार पडला होता. यंदाचा सोहळा 2014 पेक्षाही भव्य असेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *