नाशिकमध्ये भाजप नेत्याच्या घरावर शस्त्रधारींचा हल्ला, दगडफेक, नेत्याच्या आईला धमकी!

भाजप नेते विक्रम नागरे घराबाहेर असल्याने ते थोडक्यात बचावले. नागरे यांच्या मातोश्री यावेळी घरात होत्या.

नाशिकमध्ये भाजप नेत्याच्या घरावर शस्त्रधारींचा हल्ला, दगडफेक, नेत्याच्या आईला धमकी!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 12:20 PM

चंदन पूजाधिकारी, नाशिकः नाशिक (Nashik) शहरातून एक  धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील भाजप नेत्याच्या (BJP Leader) घरावर 7 ते 8 जणांच्या घोळक्याने हल्ला (Attack on BJP leader) केल्याचं वृत्त आहे. घटना काही दिवसांपूर्वी घडलेली असली तरी तिचं सीसीटीव्ही फुटेज आत्ता समोर आलं आहे  सातपूर परिसरातील नेत्याच्या घरावर चाकू, सुरे घेऊन आलेल्या गुंडांनी हल्ला केला. सुदैवाने सदर नेता घरात उपस्थित नव्हता. मात्र नेत्याच्या मातोश्रींना धमकावल्यानंतर सदर गुंड निघून गेले, अशी माहिती समोर आली आहे. भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे यांच्या घरावर हा हल्ला झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी हा हल्ला झाला असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आत्ता समोर आले आहे.

नाशिकमधील भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे यांच्या घरावर हा हल्ला झाला. हातात चाकू, सुरे आणि पिस्तूल घेऊन काही गुंडांनी हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. सातपूर परिसरातील नागरे यांच्या घरावर दगडफेक करत त्यांच्या घरात या लोकांना घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच या गुंडांनी नागरे यांच्या घरावर दगडफेक केली. घराच्या बाहेर लावलेले भाजप नेत्याचे बॅनरही फाडले.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, या परिसरात सात ते आठ जण काही काळ घुटमळले. त्यानंतर रस्त्यावरील दगड उचलून त्यांनी घराकडे भिरकावले. याच परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप काहींनी केला आहे.

भाजप नेते विक्रम नागरे घराबाहेर असल्याने ते थोडक्यात बचावले. नागरे यांच्या मातोश्री यावेळी घरात होत्या. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. नागरे यांच्या मातोश्रींना गुंडांनी धमकावल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.