Igatpuri : रस्ते, पर्यटन, सरकता जिना…मुख्यमंत्र्यांसमोर मागण्यांचा पाढा, शिंदेंचं नाशकात जल्लोषात स्वागत…

| Updated on: Jul 30, 2022 | 6:54 AM

Eknath Shinde : खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जल्लोषात स्वागत केलं...

Igatpuri :  रस्ते, पर्यटन, सरकता जिना...मुख्यमंत्र्यांसमोर मागण्यांचा पाढा, शिंदेंचं नाशकात जल्लोषात स्वागत...
Follow us on

इगतपुरी, नाशिक : नाशिक जिल्हयाचे प्रवेश द्वार असलेल्या इगतपुरी घाटमाथ्यावर घाटनदेवी मंदिराजवळ खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) , माजी आमदार काशिनाथ मेंगाळ (Kashinath Mengal) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी शिंदे समर्थक आणि भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक उमेश कस्तुरे आणि इतर लोक उपस्थित होते. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या हिंदुत्वाला महत्व देत जिल्हा दौरा करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसंगी सांगितलं. इगतपुरी महामार्गा लगत जिल्हयाचे प्रवेश द्वार असलेल्या घाटनदेवी मंदिरात देविची आरती करून दर्शन घेत पुढील दौऱ्याला सुरवात करण्यात आली . या प्रसंगी समर्थकांनी जल्लोष करीत व फटाक्यांची अतिषबाजी करीत शिंदे गट शिवसेना समर्थकांनी इगतपुरी शहर आणि तालुक्यातील विविध नागरी विकासाबाबत निवेदने दिले.

इगतपुरी शहरातील खड्डेमय झालेला जुना मुंबई – आग्रा महामार्ग नव्याने करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा या कारीता नगरसेवक उमेश कस्तुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी केली . इगतपुरीत पर्यटन क्षेत्र विकसित होत असतांना रेल्वे स्थानकात प्रमुख गाड्यांचा थांबा पुर्वरत व्हावा , खालची पेठ ते गावठा पर्यंत महामार्गा पर्यंत पुल व्हावा , जेष्ठ नागरीक , महिला , लहान मुलं , व रूग्णाच्या दळण वळण व रेल्वे प्रवासाकरीता रेल्वे स्थानकात सरकता जिना करण्यात यावा . आदि मागण्या बाबतचे मुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे यांना जष्ठनागरीक संघाच्या वतीने निवेदन दिले .

हे सुद्धा वाचा

आखिल भारतीय आदिवासी सेनाच्या निदर्शनाला पोलिसांची बंदी , प्रमुख नेते दि . ना . उघाडे पोलिसांनी ताब्यात घेतलं. जिल्हाअधिकारी व सबंधित अधिकारी विभागाकडील अनेक वर्षापासून सर्व सामान्य जनतेची प्रलंबीत प्रकरणे दडपले गेले आहेत . आंदोलने-मोर्चे करूनही अधिकारी प्रलंबीत प्रश्न लालफितीत आडकवुन जनतेची दिशाभुल करीत आहे या निषेर्धात एकनाथ शिंदे यांच्या समोर आखिल भारतिय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि . ना . उघाडे हे शेकडो कार्यकरत्यांच्या संख्यात निदर्शने करण्याच्या तयारीत असतांनाच सकाळ पासुनच पोलीसांनी उघाडे यांना ताब्यात घेत निदर्शने करण्यास बंदी केल्याने  1 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर निदर्शने करणार असल्याचे दि . ना . उघाडे यांनी माहिती दिली .

इगतपुरी नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणुक डिसेंबर महिन्यात होणार असल्याने आत्ताच शिंदे गटात सामिल होण्या पेक्षा अनेक नगरसेवक व सामाजिक नेत्यांचे वेट अँड वॉच ची भुमिका. मात्र गेली 30 वर्षापासुन नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असुनहि शहराचा विकास न झाल्याने शिव सेनेचे अधिक मताधिक्याने निवडुन आलेले नगरसेवक उमेश कस्तुरे हे शिंदे गटात सामिल झाले व अनेक शिवसेना नगरसेवक हि बंडाची तयारी करीत शिंदे गटाच्या शिवसेनेची वाट धरणार असल्याने इगतपुरीत शिवसेनाला खिंडार पडेल का ?  30 वर्षाची सत्ता कोणत्या गटाकडे जाईल या कडे नागरीकांचे लक्ष लागुन आहे .शिवसेनेचे नेते तथा नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनीहि शिंदे गटात सामिल व्हावे व नगरसेवकांनाहि सामिल करावे असे अनेकांचे प्रयत्न सुरू असुन काही दिवसात चित्र स्पष्ट होईल असे दबक्या आवाजाची चर्चा शहरात सुरू आहे .

एकनाथ शिंदे यांचे स्वागत करतांना खासदार हेमंत गोडसे , माजी आमदार काशिनाथ मेंगाळ , आमदार सुहास कांदे , नगर सेवक उमेश कस्तुरे , जनसेवा प्रतिष्ठाण चे संस्थापक किरण फलटणकर, , जिल्हाधिकारी डी गंगाधरण, प्रांतअधिकारी तेजस चव्हाण, जिल्हा परिषद मुख्या कार्यकारी अधिकारी लीना बनसोड , आयुक्त राधाकृष्ण गमे, कलेक्टर नडे, तहसिलदार परमेश्वर कासुळे,अप्पर पोलीस अधिक्षीका माधुरी कांगणे ,अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक वसंत पथवे , पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे, मुख्याधिकारी पंकज गोसावी ,महामार्ग सहा . पोलीस निरिक्षक अमोल वालझाडे ,अभियंता कौस्तुब पवार, मोहन रावत, पुरणचंद लुणावात, ताराचंद भरींडवाल, अँड . मुन्ना पवार, योगेश चांदवडकर, राम गोविंद यादव , पंचायत समिती सदस्य अण्णा पवार, मुख्याधिकारी पंकज गोसावी, योगेश चोपडा, ज्ञानेश्वर भोर, माजी नगर सेवक विजय गोडे,महेश श्रीश्रीमाळ,आदी उपस्थित होते.