नाशकात भाजप-मनसे युती निश्चित, राज्याच्या राजकारणातही कित्ता गिरवणार?

भाजप मनसे स्थायी समिती निवडणुकीत एकत्र येत असल्याने ही राज्याच्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. (Nashik MNS BJP Standing Committee)

नाशकात भाजप-मनसे युती निश्चित, राज्याच्या राजकारणातही कित्ता गिरवणार?
Devendra Fadnavis_Raj Thackeray

नाशिक : भाजप-शिवसेना संबंध राज्यात पराकोटीचे ताणले गेलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेला चित करण्यासाठी भाजपकडून मनसेला जवळ करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच प्रत्यय सध्या नाशिकमधे येत आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीत सेनेला शह देण्यासाठी मनसेने भाजपला टाळी देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे नाशिक स्थायी समितीची निवडणूक ही राज्याच्या राजकारणात भाजप-मनसे युतीची पहिली पायरी ठरण्याची शक्यता आहे. (Nashik MNS BJP to reunite for Standing Committee)

शिवसेनेचा भाजपला दणका देण्याचा प्लॅन

शिवसेना आणि भाजपामधे विस्तवही जात नसल्याचा अनुभव गेल्या काही दिवसांपासून येत आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या निमित्ताने तर भाजपाने सेनेवर चहूबाजूंनी हल्ला चढवत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परिणामी आगामी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक महापालिकेच्या निवडणुकांमधे शिवसेनेने आता महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरुनच निवडणुका लढून भाजपाला दणका देण्याचा प्लॅन केला आहे.

शिवसेनेची मनसेला जवळ करण्यासाठी व्यूहरचना

दुसरीकडे भाजपनेही सेनेचा कट्टर विरोधक असलेल्या मनसेला जवळ करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या मनसेने भाजपला मदत करण्याचं ठरवल्याने या निमित्त भाजप-मनसे पुन्हा एकत्र आल्याचं बघायला मिळणार आहे.

भाजपचा स्थायी सभापतीपदाचा मार्ग मोकळा

स्थायी समितीच्या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचं कारण म्हणजे, भाजपाचे 8 सदस्य आहेत. महाविकास आघाडीचेही 8 सदस्य आहेत. त्यामुळे मनसेचा एक सदस्य ज्याच्या पारड्यात मत टाकेल, त्यालाच सभापतीपदाची लॉटरी लागणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत मनसे भाजपला मदत करणार हे जवळपास निश्चित असल्याने भाजपचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे दगाफटका टाळण्यासाठी भाजपचे सर्वच सदस्य गुजरातकडे रवाना करण्यात आले आहेत. मनसेचा एक नगरसेवकही भाजपा नगरसेवकांसोबत असल्याची चर्चा असल्याने सभापतीपदाच्या निवडणुकांचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. (Nashik MNS BJP to reunite for Standing Committee)

गेल्या महापौरपदाच्या निवडणुकांवेळीही मनसेने भाजपला मदत केली होती. आता पुन्हा एकदा भाजप मनसे स्थायी समिती निवडणुकीत एकत्र येत असल्याने ही राज्याच्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

संबंधित बातम्या :

नाशकात सत्ताधारी भाजपला हायकोर्टाचा दणका, ‘स्थायी’त शिवसेनेच्या संख्याबळात वाढ

नाशिक स्थायी समितीची निवडणूक रंगतदार, सदस्यांची नव्याने नियुक्ती, मनसे किंगमेकर

नाशकात भाजपला मनसेची टाळी, तरी सांगलीच्या अनुभवावरुन भाजपची चांगलीच खबरदारी

(Nashik MNS BJP to reunite for Standing Committee)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI